ETV Bharat / state

केवळ दोनशे रुपयासाठी मित्राला चाकूने भोकसले... आरोपी फरार - शिर्डी क्राईम बातमी

इकराम निजाम पठाण याच्याशी अमितची चांगली मैत्री जमली. त्यांच्यामध्ये पैशाची देवाणघेवाण होत होती. दरम्यान, अमितने इकरामडून 200 रुपये घेतले होते. याच्या वादातूनच इकरामने अमितची हत्या केली.

murder-of-a-friend-for-two-hundred-rupees-in-shirdi
दोनशे रुपयासाठी मित्राला चाकूने भोकसले..
author img

By

Published : Jun 24, 2020, 4:53 PM IST

अहमदनगर- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लाॅकडामुळे काही दिवसांपासून गुन्हेगारी थांबली होती. मात्र, आता अनलाॅकनंतर शिर्डीतील थांबलेल्या गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. मागील काही दिवसांपूर्वी एका मजुराकडील पैसे हिसकावून त्याची निर्घृण हत्या झाली होती. तर आता उसने 200 रुपये घेतल्याच्या कारणावरुन एकाची भोकसून हत्या झाली आहे.

अमित प्रेमजी सोला हा मुळचा वसई ठाणे येथील रहिवाशी होता. तो शिर्डी नजिक चारी नंबर 11 येथे वॉचमनचे काम करत होता. इकराम निजाम पठाण याच्याशी अमितची चांगली मैत्री जमली. मैत्रीत पैशाची देवाणघेवाण होत होती. दरम्यान, अमितने इकरामडून 200 रुपये घेतले होते. मात्र, लाॅकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाने अमित पैसे लवकर देऊ शकला नाही.

पैस लवकर दिले नाहीत म्हणून अमित आणि निजामध्ये वाद झाला. यातून इकरामने अमितला चाकूने भोकसले. यात जखमी अमितला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलीस निरिक्षक दिपक गंधाले यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.