ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये जमिनीच्या वादातून एकाचा चाकू भोकसून खून - अहमदनगरमध्ये जमिनीच्या वादातून खून

नय्यूम लतीफ देशमुख (वय ५०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भानसहिवरे येथील लतीफ देशमुख यांचे कय्यूम, नय्यूम, रफिक, मोईन व नदीम अशा पाच विवाहित मुलांपैकी कय्यूम हे गावात तर इतर चौघे नगर येथे राहतात.

Murder by stabbing one in a land dispute in ahmednagar
अहमदनगरमध्ये जमिनीच्या वादातून एकाचा चाकू भोकसून खून
author img

By

Published : Dec 23, 2020, 8:16 AM IST

अहमदनगर - नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथे जमिनीच्या वादातून एकाचा खून झाला आहे. दोन सख्या भावांमध्ये झालेल्या भांडणातून ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले.

हेही वाचा - श्रीलंका दौऱ्यासाठी इंग्लंडच्या संघात येणार आफ्रिकेचा माजी फलंदाज

नय्यूम लतीफ देशमुख (वय ५०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भानसहिवरे येथील लतीफ देशमुख यांचे कय्यूम, नय्यूम, रफिक, मोईन व नदीम अशा पाच विवाहित मुलांपैकी कय्यूम हे गावात तर इतर चौघे नगर येथे राहतात. देशमुख यांचे भानसहिवरे येथील गढी परिसरात अडीच एकर शेत जमीन आहे. त्या जमिनीच्या वाटणीसंदर्भात शेतात आठ जणांची बैठक झाली. त्यात वादावादी होऊन एकाने नय्यूमवर चाकूने हल्ला केला.

या घटनेनंतर, नय्युमला रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र , उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.