ETV Bharat / state

शहरातील अनधिकृत शरण मार्केटवर मनपाचा बुलडोझर; एकशे तीन गाळे जमीनदोस्त - नगरविकास विभाग

या परिसरात बेकायदेशीर गाळे बांधण्यात आल्याची तक्रार लोकायुक्तांकडे करण्यात आली होती.

अनधिकृत शरण मार्केट जमीनदोस्त करताना बुलडोजर
author img

By

Published : Jul 12, 2019, 3:00 PM IST

अहमदनगर - शहरातील तोफखाना परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या शरण मार्केटमधील गाळ्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. आज सकाळी या कारवाईला सुरुवात झाली.

शहरातील अनधिकृत शरण मार्केटवर मनपाचा बुलडोझर.. एकशे तीन गाळ्यांवर हातोडा

या परिसरात बेकायदेशीर गाळे बांधण्यात आल्याची तक्रार लोकायुक्तांकडे करण्यात आली होती. त्यावर लोकायुक्तांनी सुनावणी केली आणि कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, कारवाई होत नसल्याने नगरविकास विभागाच्या सचिवांकडून लोकायुक्तांनी अहवाल मागवला होता. त्यामुळे मनपाने शुक्रवारी सकाळी कारवाईला सुरुवात केली.

या कारवाईत सुमारे १०३ गाळे जमीनदोस्त करण्यात आले आहेत. अतिक्रमण निर्मूलन विभागाने पोलीस बंदोबस्तामध्ये या मार्केटवर कारवाई सुरू केली आहे.

Intro:अहमदनगर- अनधिकृत शरण मार्केटवर मनपाचा बुलडोझर.. एकशे तीन गाळ्यांवर हातोडा !!Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_shoping_market_vij_7204297

अहमदनगर- अनधिकृत शरण मार्केटवर मनपाचा बुलडोझर.. एकशे तीन गाळ्यांवर हातोडा !!

अहमदनगर-  शहरातील तोफखाना  परिसरातील अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या शरण मार्केटमधील गाळ्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. आज सकाळी कारवाईला सुरुवात झाली.
या परिसरात बेकायदेशीर गाळे बांधण्यात आल्याची तक्रार लोकायुक्तांकडे झाली होती. त्यावर सुनावणी होऊन कारवाईचे आदेश देण्यात आले होते. कारवाई होत नसल्याने नगरविकास विभागाच्या सचिवांना लोकायुक्तांनी अहवाल मागवला होता. त्यामुळे मनपाने शुक्रवारी सकाळी कारवाईला सुरुवात केली. या कारवाईत सुमारे १०३ गाळे जमीनदोस्त करण्यात आले आहेत. अतिक्रमण निर्मूलन विभागाने पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू केली आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- अनधिकृत शरण मार्केटवर मनपाचा बुलडोझर.. एकशे तीन गाळ्यांवर हातोडा !!
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.