मुंबई - ट्रेन क्रमांक 17208 व 17207 साठी सुधारित संरचना यात एक प्रथम वातानुकूलितसह द्वितीय वातानुकूलित, (Vijayawada Tirupati Express)दोन द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये २ गार्ड्स ब्रेक व्हॅन असेल.
ट्रेन क्रमांक 17417व 17418 साईनगर शिर्डी - तिरुपती एक्स्प्रेसला एक अतिरिक्त शयनयान डब्बा साईनगर शिर्डी येथून असेल .हा डबा दि. २१ डिसेंम्बर २०२२ पासून आणि तिरुपती येथून दि. २० डिसेंम्बर २०२२ पासून जोडण्यात येईल.
ट्रेन क्रमांक 17417 व 17418 साठी सुधारित संरचना अशी असेल एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, ९ शयनयान, एक पॅंट्री कार, ८ सामान्य द्वितीय श्रेणीसह दोन गार्ड ब्रेक व्हॅन असणार. वरील गाड्यांमधील प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना मध्य रेल्वे प्रशासनाने विनंती आहे की त्यांनी ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी त्यांच्या तिकिटांची स्थिती तपासावी.