ETV Bharat / state

साई प्रसादालयात १२ दिवसांत १ लाख १० हजार भक्‍तांनी घेतला प्रसाद भोजनाचा लाभ - sai temple reopen

राज्‍य शासनाच्‍या आदेशान्‍वये १६ नोव्‍हेंबरपासून साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्‍या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्‍यात आले आहे. कोरोनाचे सावट संपले नसल्‍यामुळे साईंच्या दर्शनाकरीता सामाजिक अंतराचे पालन करुन ठरावीक संख्‍येनेच भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे.

sai prasadalay shirdi
साई प्रसादालय
author img

By

Published : Nov 30, 2020, 8:49 AM IST

अहमदनगर - राज्‍य शासनाच्‍या आदेशाने साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्‍यात आले आहे. १६ नोव्‍हेंबर ते २७ नोव्‍हेंबर या कालावधीत ९१ हजार १३६ साईभक्‍तांनी श्रींच्‍या दर्शनाचा लाभ घेतला. तर याकाळात साईप्रसादालयामध्‍ये सुमारे १ लाख १० हजार साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला, अशी माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी दिली.

साई प्रसादालय शिर्डी..
ऑनलाइन बुकींग करून दर्शनासाठी यावे- सध्‍या कोरोना विषाणूची साथ सुरू आहे. त्यामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍यावतीने लॉकडाऊन लावण्‍यात आले होते. राज्‍य शासनाच्‍या आदेशान्‍वये १६ नोव्‍हेंबरपासून साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्‍या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्‍यात आले आहे. कोरोनाचे सावट संपले नसल्‍यामुळे साईंच्या दर्शनाकरीता सामाजिक अंतराचे पालन करुन ठरावीक संख्‍येनेच भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. त्‍यामुळे साईभक्‍तांनी आपली गैरसोय टाळण्‍यासाठी ऑनलाइन बुकींग निश्चित करुनच शिर्डी येथे साईदर्शनाकरीता यावे. तसेच पालखी मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी पदयात्रींसह पालखी घेऊन शिर्डी येथे येण्‍याचे टाळावे, असे आवाहन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी केले आहे.भाविकांच्या निवासाची व्यवस्था -

१६ नोव्‍हेंबर ते २७ नोव्‍हेंबर या कालावधीत ९१ हजार १३६ साईभक्‍तांनी ऑनलाइन, टाइम बेस व सशुल्‍क दर्शन पासेसच्‍या माध्‍यमातून साईदर्शनाचा व साईप्रसादालयामध्‍ये सुमारे १ लाख १० हजार साई भक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तसेच याकालावधीत संस्‍थानचे साई आश्रम भक्‍तनिवास, व्‍दारावती भक्‍तनिवास, साईधर्मशाळा, साईबाबा भक्‍तनिवास्‍थान व साईप्रसाद निवास आदी निवास्‍थानांव्‍दारे २१ हजार १२४ साईभक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली असल्‍याचे कान्‍हूराज बगाटे यांनी सांगितले.

हेही वाचा - शिर्डी : साई मंदिराच्या दानपेटीतील पैसे मोजणे सुरू

हेही वाचा - शिर्डी साई संस्थानला नऊ दिवसात भाविकांनी दिली 3 कोटी 9 लाख देणगी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.