ETV Bharat / state

मनसे पदाधिकाऱ्यांनी केली वीज वितरण कार्यालयाची तोडफोड.. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

author img

By

Published : Nov 26, 2020, 3:55 PM IST

मनसेच्या कार्यकर्त्यांनी वीजवितरण कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या दालनाची तोडफोड केली आहे. तसेच, खुर्च्यांची तोडफोड केली आहे. अनेक वेळा निवेदन देऊनही शासनाला जाग येत नसल्याने हे आंदोलन करण्यात आल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

अहमदनगर मनसे तोडफोड न्यूज
अहमदनगर मनसे तोडफोड न्यूज

अहमदनगर - वाढीव वीज बिलाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यभरात जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मनसेचा मोर्चा धडकला आहे. कोपरगाव शहरात मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वीज वितरण कार्यालयात जाऊन खळखट्याक आंदोलन केले.

अहमदनगर मनसे कार्यकर्त्यांची वीज वितरण कार्यालयात तोडफोड

मनसेच्या कार्यकर्त्यांनी वीजवितरण कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या दालनाची तोडफोड केली आहे. तसेच, खुर्च्यांची तोडफोड केली आहे. अनेक वेळा निवेदन देऊनही शासनाला जाग येत नसल्याने हे आंदोलन करण्यात आल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - मराठा क्रांती मोर्चा आंदोलन : मराठा आरक्षणाशिवाय सुरू झालेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेविरोधात निषेध

यावेळी तोडफोड झाल्याची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, शहर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक दीपक बोरसे, उपनिरीक्षक भारत नागरे हे घटनास्थळी पोहचले आणि मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. या वेळी, मनसेचे उपजिल्हाप्रमुख संतोष गंगवाल, तालुकाप्रमुख अनिल गायकवाड, तालुका मार्गदर्शक सुनील फंड, अपंग सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गंगवाल तसेच, अन्य एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा - गडचिरोलीत माओवाद्यांचा बंद : माओवाद्यांनी रस्त्यावर झाडे तोडून बस अडवली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.