ETV Bharat / state

पाथर्डी : राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयाची मनसेकडून तोडफोड - मनसे आंदोलन

पाथर्डीतील अतिशय दाट वर्दळ व वाहतूक असलेल्या रस्त्यांवर निकृष्ट कामामुळे खड्डे पडले आहेत. पावसामुळे डबक्यात पाणी साचून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयात तोडफोड केली.

mns
मनसे तोडफोड
author img

By

Published : Sep 16, 2020, 3:42 PM IST

पाथर्डी (अहमदनगर) - पाथर्डी शहरातील अतिशय दाट वर्दळ व वाहतूक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व शहरातील हमरस्त्यावर निकृष्ट कामामुळे मोठे खड्डे पडलेले आहेत. मोठ्या खड्ड्यांचे रुपांतर डबक्यात झाले आहे. त्यामुळे अपघात होतात. डबक्याच्या काठावर मासेमारी व पर्यटन व्यवसाय करण्यासाठी बेरोजगार तरुणांना परवानगी मिळावी, अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयात तोडफोड केली आणि नगरपालिका कार्यालयात बोंबाबोंब आंदोलन केले.

राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात अधिकारी उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील मोडतोड करत अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला चपलांचा हार घातला तसेच सार्वजनिक बांधकाम कार्यालयात जबाबदार अधिकारी नसल्याने तिथे निषेधाच्या घोषणा दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कोरडगाव शेवगाव रोड चौक, तीन हात चौक, माणिकदौंडी चौक रस्त्यावर नगरपरिषद व महामार्ग विभागाने कच्च्या मातीचा भराव करून त्यावर डांबर टाकल्याने तिथे खड्डे पडून त्याचे रूपांतर डबक्यात झाले आहे.

सध्या पावसामुळे भरपूर पाणी जमा होऊन खड्ड्यांचे रूपांतर छोट्या तळ्यांमध्ये झालेले आहे. शहरातील अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार नसल्याने या तळ्यामध्ये मत्स्य पालन व्यवसाय करण्यासाठी व खड्डे रूपी तळ्याच्या काठावर निसर्ग पर्यटनस्थळ विकसित करून छोट्या व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी मनसे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, जिल्हाध्यक्ष परिवहन अविनाश पालवे, जिल्हाध्यक्ष विद्यार्थी सेना प्रवीण शिरसाट, शहर सचिव संदीप काकडे, शहर उपाध्यक्ष राजू गिरी, शहराध्यक्ष विद्यार्थी सेना जयंत बाबर, गणेश कराडकर, एकनाथ सानप, संजय चौनापुरे, एकनाथ भंडारी, रंगनाथ वांडेकर, बाबासाहेब सांगळे आदींनी आंदोलन केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.