अहमदनगर- नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप तर त्यांचे वडील आणि विधानपरिषदेतील आमदार अरुण जगताप यांनी नगर शहरातील विविध भागात गरजूंसाठी विविध प्रकारची मदत सुरू केली आहे. हातावर पोट असलेला वर्ग नगर शहर आणि उपनगरात असल्याने लॉकडाऊन मुळे अनेक कुटुंबावर बेरोजगारी मुळे उदरनिर्वाहाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जगताप ऑइटा-पुत्रांनी विविध भागात जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा सुरू केला आहे. आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या प्रेरणा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यासाठी कामाला लागले आहेत.
कोणतीही व्यक्ती उपाशी राहू नये याची काळजी प्रेरणा प्रतिष्ठान घेत आहे असे जगताप यांनी म्हंटले आहे.
प्रशासन,आरोग्य, पोलीस विभाग कोरोना पासून संरक्षण होण्यासाठी सर्व नगरच्या जनतेची काळजी घेत आहे. प्रशासनही आपली चांगली भूमिका बजावत असल्याबद्दल आमदार अरुणकाका जगताप यांनी प्रशासनाचे आभार मानले आहे.
जीवनावश्यक वस्तूंची मदत ही घरपोहच मिळणार असून मदत घरपोच मिळणार असल्याने नागरिकांनी घरीच राहावे, बाहेर पडू नये तरच आपण कोरोनावर मात करू, असे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारने केलेल्या सर्व नियामंचे तंतोतंत पालन करून हा किराणामाल नागरिकांच्या घरी पोहच केला जाणार आहे. यात २५ टन गव्हाचे पीठ, ५ टन साखर, ५ टन तूर डाळ, हजार लीटर खाद्य तेल, बेसनपीठ अडीच टन, सर्व प्रकारचे मसाले, चहा पावडर, जीरे, मोहरी, बिस्कीटे, मीठ, अंगाचा व कपड्याचा साबन यामध्ये दिले जाणार आहेत. या सर्व किराणामालाचे कीट केले असून प्रेरणा प्रतीष्ठानचे कार्यकर्ते आठ वाहनातून नागरिकांना पोहच करत आहेत.