अहमदनगर - महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला. भाजपा फक्त असत्य गोष्टींवर राजकारण करत आहे. तर महाविकास आघाडी समाजकारण करत आहे. भाजपाने जे मुद्दे सरकार विरोधात लावून धरले यात तेच तोंडघशी पडले आहेत. जनतेत महाविकास आघाडी बद्द्ल विश्वास वाढत चालला आहे. तर भाजपा बद्दल चीड निर्माण होत आहे, असा निर्वाळा रोहित पवार यांनी केला. जामखेड तालुक्यातील ऐतीहासीक खर्डा शहरात "खर्डा लढाई" पुस्तकाचे प्रकाशन सोहळा आमदार रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी बोलताना रोहित पवार यांनी एखादा अधिकारी पदावर आसताना आरोप करत नाही. पदावरून गेल्यावर दिल्लीत जाऊन काही राजकारणी लोकांना भेटतो व नंतर आरोप करतो. याची चौकशी सुरू आहे, त्यामुळे लवकरच सत्य बाहेर येईल व आरोप करणारे तोंडघशी पडतील, असे मत पवार मुंबई पोलीस आयुक्त पदावरून दूर केलेल्या परमबीर सिंग यांच्याबद्दल व्यक्त केले.
असत्य गोष्टींवर भाजपचे राजकारण-
भाजप केवळ असत्य गोष्टींवर राजकारण करत आहे. अभिनेता सुशांत प्रकरणात पण बिहार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने राळ उठवली. मात्र कालांतराने सत्य बाहेर आले, मात्र यात महाराष्ट्राची बदनामी करण्याचे काम भाजपने केले, आताही काही असत्य मुद्दे घेऊन राजकारण केले जात असले तरी जनतेच्या लक्षात ही गोष्ट येत असून यातून भाजप विरोधात जनतेत लाट निर्माण होत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला.
अशा प्रसंगातून आघाडी अधिक घट्ट होत आहे-
महाविकास आघाडी ही एकसंघ आहे. सध्या निर्माण केले जात असलेले प्रश्न आणि होत असलेले आरोप यामुळे कुणीही नाराज नाही. उलट अशा प्रसंगातून आघाडीतील तीनही पक्ष अजून जवळ आले असून आघाडी अजून घट्ट झाली, असल्याचा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
हेही वाचा- ...तर रश्मी शुक्ला यांच्यावर सरकार कारवाई का करत नाही - सुधीर मुनगंटीवार