ETV Bharat / state

Gopichand Padalkar Stopped Police : अहिल्याबाई होळकरांचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या पडळकरांना पोलिसांनी अडवले - Gopichand Padalkar Stopped by Police

आमदार गोपीचंद पडळकर ( MLA gopichand padalkar ) यांनी चौंडीतच जयंतीचा एक कार्यक्रम घेण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाला परवानगी मागितली होती. ही परवानगीही नाकारण्यात आली. तरीही चौंडीत अहिल्यादेवी होळकरांचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या पडळकर व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे अडविले. ( Gopichand Padalkar Stopped Police )

Gopichand Padalkar Stopped by Police
अहिल्याबाई होळकर
author img

By

Published : May 31, 2022, 12:56 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील चौंडी येथे आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती ( Ahilyabai Holkar Jayanti 2022 ) साजरी करण्यात येत आहे. या जयंती उत्सवात आमदार गोपीचंद पडळकर ( MLA gopichand padalkar ) यांना बोलावण्यात आले नाही. तसेच पडळकर यांनी चौंडीतच जयंतीचा एक कार्यक्रम घेण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाला परवानगी मागितली होती. ही परवानगीही नाकारण्यात आली. तरीही चौंडीत अहिल्यादेवी होळकरांचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या पडळकर व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे अडविले. ( Gopichand Padalkar Stopped by Police )

चौंडी येथे कार्यक्रम - ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत चौंडी येथे अहिल्यादेवी जयंती उत्सव होत आहे. या उत्सवाला अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री धनंजय मुंडे, दत्तात्रेय भरणे, आमदार रोहित पवार, नीलेश लंके, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, भुषणसिंहराजे होळकर, बाळासाहेब आदी उपस्थित आहे. मात्र या उत्सवात अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरकडील 9 वे वंशज असलेल्या राम शिंदे यांना निमंत्रित केले नाही. तसेच गोपीचंद पडळकर यांनाही बोलावण्यात आलेले नाही.

हेही वाचा - Ashish Deshmukh resigns : राज्यसभेच्या उमेदवारीवरून आशिष देशमुख काँग्रेस प्रदेश महासचिव पदाचा देणार राजीनामा

समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी - राम शिंदे यांनी पहाटेच जाऊन अहिल्यादेवी होळकरांचे स्मारक व अहिल्येश्वर देवस्थानात जाऊन पूजा केली. तसेच अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले. गोपीचंद पडळकर यांनी जेजुरीत जाऊन पूजा केली. तसेच तेथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर पडळकर हे कर्जत मार्गे चौंडीच्या दिशेने निघाले होते. त्यांच्या बरोबर माजी मंत्री सदाभाऊ खोतही आहेत. अहिल्यादेवी होळकर यांचे दर्शन घेण्यासाठी निघालो असल्याचे त्यांचे म्हणणे होते. मात्र पोलिसांनी त्यांना चापडगाव येथे अडविले. त्यामुळे त्यांच्या बरोबर असलेल्या समर्थकांनी महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.

हेही वाचा - नोटाबंदीचे धोरण चुकलेच, रिझर्व बँकेच्या हवाल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.