ETV Bharat / state

जामखेड पंचायत समितीच्या हातपंप दुरुस्ती टेम्पोने लहान मुलीला चिरडले - minor

अनुजा गणेश कोल्हे, असे या मुलीचे नाव आहे. अनुजा ही आज दुपारी चार वाजता कोल्हेवस्तीवर रस्ता ओलांडत असताना तालुका पंचायत समितीची हातपंप दुरुस्तीची गाडी भरधाव वेगाने जामखेड कडे येत होती. याच वेळी या गाडीने चिमुरडीला चिरडले. यात मुलीचा जागेवरच मृत्यू झाला.

मृत अनुजा गणेश कोल्हे
author img

By

Published : Jun 3, 2019, 9:55 PM IST

अहमदनगर - जामखेड पंचायत समितीच्या ठेकेदाराच्या हातपंप दुरुस्ती करणार्‍या गाडीने रस्ता ओलांडणाऱ्या एका पाच वर्षाच्या मुलीला चिरडल्याची घटना घडली आहे. अनुजा गणेश कोल्हे, असे या मुलीचे नाव आहे. यात मुलीचा जागेवरच मृत्यू झाल्याने राजुरी परीसरात शोककळा पसरली आहे.

जामखेड तालुक्यातील राजुरी हे गाव शिर्डी-हैदराबाद महामार्गावर जामखेडपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. अनुजा ही आज दुपारी चार वाजता कोल्हेवस्तीवर रस्ता ओलांडत असताना तालुका पंचायत समितीची हातपंप दुरुस्तीची गाडी भरधाव वेगाने जामखेड कडे येत होती. याच वेळी या गाडीने चिमुरडीला चिरडले. अपघातानंतर चालक घाबरून पळून गेला.

जामखेड पंचायत समितीच्या हातपंप दुरुस्ती टेम्पोने लहान मुलीला चिरडले.

घटनेनंतर कोल्हेवस्तीवर एकच शोककळा पसरली. अनुजाला ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. पण तिचा मृत्यू झाल्याने डॉ. युवराज खराडे यांनी शवविच्छेदन केले व रात्री उशिरा राजुरी कोल्हेवस्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जामखेड पंचायत समितीचा भोंगळ कारभार

सध्या पंचायत समितीमध्ये हातपंप दुरुस्तीच्या गाड्यांवर ठेकेदार पद्धतीने चालकाची भरती केलेली आहे. चालकाकडे हेवी लायसन्स गरजेचे आहे. त्यामुळे या अपघाताला पंचायत समिती जबाबदार असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. तसेच चालकावर ३०२ चा गुन्हा दाखल करवा, अशी नातेवाईकांनी मागणी केली आहे.

Intro:अहमदनगर- जामखेड पंचायत समितीच्या हातपंप दुरुस्ती टेम्पोने लहान मुलीला चिरडले..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_accident_girl_death_2019_vij1_7204297

अहमदनगर- जामखेड पंचायत समितीच्या हातपंप दुरुस्ती टेम्पोने लहान मुलीला चिरडले..

अहमदनगर- जामखेड पंचायत समितीचच्या ठेकेदाराच्या हातपंप दुरुस्ती करणार्‍या गाडीने पाच वर्षाच्या अनुजा गणेश कोल्हे या चिमुरडीला रस्ता ओलांडताना चिरडले, यात चिमुकलीचा जाग्यावरच मृत्यू झाल्याने राजुरी परीसरात शोककळा पसरली आहे.
जामखेड तालुक्यातील राजुरी हे गाव शिर्डी हैदराबाद महामार्गावर जामखेड पासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. अनुजा ही आज दुपारी चार वाजता कोल्हेवस्तीवर रस्ता ओलांडत असताना तालुका पंचायत समितीची हातपंप दुरुस्तीची गाडी भरधाव वेगाने जामखेड कडे येत होती. यातच या चिमुरडीला चिरडले, अपघाता नंतर चालक घाबरून पळून गेला. घटनेनंतर कोल्हेवस्तीवर एकच शोककळा पसरली. अनुजाला ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते पण तिचा मृत्यू झाला असल्याने डॉ. युवराज खराडे यांनी शवविच्छेदन केले व रात्री उशिरा राजुरी कोल्हेवस्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जामखेड पंचायत समितीचा भोंगळ कारभार !!
-सध्या पंचायत समितीमध्ये हातपंप दुरुस्तीच्या गाड्यांवर ठेकेदार पद्धतीने चालकाची भरती केलेली आहे. चालकाकडे हेवी लायसन्स गरजेचे आहे. त्यामुळे या अपघाताला पंचायत समिती जबाबदार असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. तसेच चालकावर ३०२ चा गुन्हा दाखल करवा अशी नातेवाईकांनी मागणी केली आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- जामखेड पंचायत समितीच्या हातपंप दुरुस्ती टेम्पोने लहान मुलीला चिरडले..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.