ETV Bharat / state

2022च्या मध्यापर्यंतच नगरमधील निळवंडे कालव्यांची कामे पूर्ण करणार - जलसंपदा मंत्री - जयंत पाटील निळवंडे कालवा नगर

'अहमदनगर येथील निळवंडे धरण, कालव्यांच्या कामासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा अगदी दररोज पाठपुरावा आहे. या कामासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही', असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

अहमदनगर
अहमदनगर
author img

By

Published : May 22, 2021, 7:59 PM IST

अहमदनगर - 'उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण, कालव्यांच्या कामासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा अगदी दररोज पाठपुरावा आहे. 2022च्या मध्यापर्यंत प्रकल्पाचे पूर्ण काम मार्गी लागून लाभक्षेत्रात पाणी देण्याचा प्रयत्न राहील. या कामासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही', असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. संगमनेर तालुक्यातील आढळा नदीवरील आढळा सेतू पुलाच्या कामाची पाहणी जयंत पाटलांनी केली, यावेळी ते बोलत होते.

2022 च्या मध्यापर्यंतच नगरमधील निळवंडे कालव्यांची कामे पूर्ण करणार - जलसंपदा मंत्री

'2022च्या पावळ्यापर्यंत काम होणार पूर्ण'

'उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील पाच ते सहा तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी निळवंडे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळातच या धरणाचे काम पूर्ण झाले. याच काळात या कामाला गती मिळाली होती. मात्र, मागील पाच वर्षात काम थांबले होते. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर या प्रकल्पासाठी 491 कोटी रूपयांची भरीव निधीची तरतूद केली आहे. या कामाला गती आली आहे. निळवंडे कालव्याच्या कामाला बाळासाहेब थोरात यांनी दररोज पाठपुरावा करून अत्यंत प्राधान्य दिले आहे. सर्वत्र कोरोनाचे संकट आहे. तरीही या कामाला कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही. 2022मधील पावसाळ्याच्या मध्यावर या प्रकल्पाचे पूर्ण काम होऊन लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना पाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी विविध ठिकाणची स्ट्रक्चरल कामे, जमीन अधिग्रहण, पुलाची अशी अनेक कामे तातडीने मार्गी लावली जात आहेत', असे जयंत पाटलांनी म्हटले आहे.

'हे काम पूर्णत्वास येतंय हा मोठा आनंद'

यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही उपस्थित होते. ते म्हणाले, की 'निळवंडे धरणाचे कालवे पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देणे हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपण यासाठी सातत्याने काम करत आहोत. हे काम पूर्णत्वास येत आहे, हा मोठा आनंद आपल्याला आहे. लवकरात लवकर लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना पाणी देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार काम करत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सातत्याने या कामासाठी मोठी मदत केली आहे'.

हेही वाचा - बंगाल आणि जगाने विदूषक कोण हे दाखविले आहे.. शेलारांच्या टीकेला पटोलेंचे प्रत्युत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.