ETV Bharat / state

आजाराची लक्षणे दिसताच नागरिकांनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

नागरिकांनीही या उपाययोजनांमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन करतानाच, आजाराची लक्षणे आढळून आल्यास तत्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन थोरात यांनी केले.

आजाराची लक्षणे दिसताच नागरिकांनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधा

author img

By

Published : May 9, 2021, 6:41 AM IST

शिर्डी (अहमदनगर)- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर बाधित होत आहेत. तालुका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत. नागरिकांनीही या उपाययोजनांमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन करतानाच, आजाराची लक्षणे आढळून आल्यास तत्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

राहाता व शिर्डी परिसरातील कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली साईसंस्थान सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपस्थित प्रशासनातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी खासादर सदाशिव लोखंडे, आ.सुधीर तांबे, साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद म्हस्के, यावेळी उपस्थित होते.

आजाराची लक्षणे दिसताच नागरिकांनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधा
आजाराची लक्षणे दिसताच आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधा

रुग्णांच्या सुविधांचा आढावा

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी ऑक्सिजन प्लांट उभारणी, आरटीपीसीआर लॅब उभारणी, कोविड उपचारांसाठी बेडची संख्या वाढविणे, रुग्णांना औषधोपचार व औषधांचा पुरवठा तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला. साईसंस्थानतर्फे चालविण्यात येणाऱ्या कोविड केअर सेंटर येथे कार्यरत आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोविड रुग्णांची मानवतेच्यादृष्टीने सेवा करावी, अशी सूचना मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

खासदार सदाशिव लोखंडे यांनी तालुक्यातील आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून कोविडबाधित रुग्णांवर योग्य उपचार करावा, अशी सूचना केली. साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णांशी सौजन्याने वागावे असे सांगितले. उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती सादर केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.