ETV Bharat / state

Balasaheb Thorat Homage Shankarrao Kolhe : 'राज्याच्या राजकारणासह सहकार क्षेत्रातील अनुभवी नेतृत्व हरपले' - शंकररावजी कोल्हे यांचे निधन

शिस्तप्रिय व अभ्यासू स्वभाव हे वैशिष्ट असलेले ज्येष्ठ नेते स्व.शंकरराव कोल्हे यांनी जिल्हा बँक व जिल्ह्याच्या विकासासाठी कायम साथ दिली. त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याची मोठी हानी झाली असून राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ व अनुभवी नेतृत्व हरपले, अशी भावना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

बाळासाहेब थोरात आणि शंकरराव कोल्हे
बाळासाहेब थोरात आणि शंकरराव कोल्हे
author img

By

Published : Mar 16, 2022, 5:34 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यात सहकार चळवळ उभारणीत महत्वाचा वाटा असणाऱ्या शिलेदारांपैकी एक असलेल्या स्व.शंकररावजी कोल्हे यांचे जिवनकार्य दिशादर्शक ठरले आहे. सरपंच ते मंत्री या त्यांच्या राजकीय जिवन प्रवासात त्यांनी सहकार, समाजकारण, कृषी, शिक्षण या क्षेत्रात ही महत्वपूर्ण योगदान दिले. शिस्तप्रिय व अभ्यासू स्वभाव हे वैशिष्ट असलेले ज्येष्ठ नेते स्व.शंकरराव कोल्हे यांनी जिल्हा बँक व जिल्ह्याच्या विकासासाठी कायम साथ दिली. त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याची मोठी हानी झाली असून राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ व अनुभवी नेतृत्व हरपले, अशी भावना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

'सहकार व शिक्षण क्षेत्रातील मार्गदर्शक हरपले'

सहकारातून सर्व सामान्यांच्या जीवनात नवी पहाट फुलवितांना शिक्षणातून समाजाचा विकास करण्याचे कार्य स्व. शंकररावजी कोल्हे यांनी आयुष्यभर केले. त्यांनी सहा वेळा कोपरगांव मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले असून संजीवनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची सुविधा निर्माण करुन दिली. 9 वर्ष साई संस्थानचे उपाध्यक्ष म्हणून योगदान ही दिले. आधुनिक विचारांची जाण असलेले कोल्हे यांच्या निधनाने सहकार व शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपले, असल्याची प्रतिक्रिया नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सुधीर तांबे यांनी व्यक्त केली.

'ज्येष्ठ अभ्यासू मागदर्शक'

जुन्या काळात बीएससी ॲग्री झालेल्या कोल्हे साहेबांनी येसगांवचे सरपंच ते मंत्री या राजकीय प्रवासाबरोबर आधुनिक विचारातून सहकार व शिक्षण क्षेत्रात बहुमोल योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने ज्येष्ठ अभ्यासू मार्गदर्शक हरपले असल्याची भावना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - MNS attack IPL Bus Mumbai : वाहतुकीचे काम स्थानिकांना न दिल्याने मनसे कार्यकर्त्यांनी IPL ची बस फोडली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.