अहमदनगर - मुख्यमंत्री ठाकरेंनी साईबाबांच्या जन्मस्थळाबद्दल केलेल्या विधानावर मी टिप्पणी करण्याएवढा मोठा नाही. त्यामुळे या वादावर स्वत: मुख्यमंत्री मार्ग काढतील, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
मंत्री अमित देशमुख यांनी आज (दि. 20 जाने.) सायंकाळी शिर्डीत येऊन साईबाबांचे दर्शन घेतले आहे. साई दर्शनानंतर देशमुख पत्रकारांशी बोलताना म्हणाले, शिर्डी साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र दिला आणि मला खात्री आहे, की यावर साईबाबाच मार्ग काढतील. साईबाबांवर कोणी राजकारण करणे योग्य नाही. यामुळे राजकरण्यांनी यावर राजकरण करु नये, असे मतही मंत्री देशमुखांनी व्यक्त केले. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने देशमुख यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
हेही वाचा - शिर्डी ग्रामस्थांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, दुपारी २ वाजता बैठक