ETV Bharat / state

संगमनेर शहरातील वखार महामंडळाच्या धान्य साठवणुकीच्या गोदामांना भीषण आग - warehouse fire wakhar Corporation Sangamner

संगमनेर शहरातील बाजार समितीच्या प्रांगणात असलेल्या वखार महामंडळाच्या धान्य साठवणुकीच्या गोदामांना काल रात्री आठच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, काही वेळातच गोदामातील संपूर्ण कापूस आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

fire warehouse wakhar Corporation Sangamner
वखार महामंडळ गोदाम आग संगमनेर
author img

By

Published : Apr 28, 2021, 6:55 AM IST

अहमदनगर - संगमनेर शहरातील बाजार समितीच्या प्रांगणात असलेल्या वखार महामंडळाच्या धान्य साठवणुकीच्या गोदामांना काल रात्री आठच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, काही वेळातच गोदामातील संपूर्ण कापूस आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. वेळेत सूचना मिळूनही संगमनेर नगरपालिका आणि सहकार महर्षी थोरात कारखान्याचा टँकर उशिराने दाखल झाल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली.

आग लागल्याचे दृष्य

हेही वाचा - शिर्डी : कडक निर्बंधांमुळे प्रसाद विक्रेते अडचणीत, लाखोंचे नुकसान

गोदामात मोठ्या प्रमाणात कापूस साठवलेला असल्याने आगीचे स्वरूप अधिक भीषण झाले. आगीच्या ज्वाळांनी गोदामावरील पत्रे अक्षरशः कस्पटासमान उडून इतरत्र पडत असल्याचे चित्र यावेळी क्षणोक्षणी दिसत होते. आगीचे वृत्त समजताच प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यासह पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर व अन्य अधिकारी घटनास्थळी हजर झाले होते. संगमनेर नगरपालिका आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचा अग्निशमन बंब आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होता.

हेही वाचा - जामखेडच्या 'सख्ये सोबती' व्हाट्सअॅप ग्रुपचा अभिनव उपक्रम; कोविड सेंटरला सव्वा लाखाची मदत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.