ETV Bharat / state

गडी ऐकतच नाही..!! अशोक चव्हाणांच्यामुळे मराठा समाजाचे नुकसान - नरेंद्र पाटील - NAREDARA PATIL SALM ON ASHOK CHAVAN

मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण खूप ताठर आहेत. गडी ऐकतच नाही. त्यांनी मराठा क्रांती मोर्चाशी कधीही समन्वय ठेवला नाही. वास्तविक आम्ही एकनाथ शिंदे यांची मागणी सुरुवाती पासून केली होती, त्यांनी मागील युती सरकार मध्ये चंद्रकांतदादा पाटील यांच्या सोबत या प्रश्नावर काम केले होते, असे ही नरेंद्र पाटील यावेळी बोलताना म्हणाले.

maratha reservatioin
नरेंद्र पाटील मराठा
author img

By

Published : Mar 7, 2021, 11:09 AM IST

अहमदनगर- मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण हे खूप ताठर आहेत, गडी ऐकायलाच तयार नाही, त्यांच्यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समनव्यक आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे. अहमदनगर मध्ये मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आयोजित मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेल्या विविध मराठा संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपस्थिती लावल्यानंतर माध्यमांशी वार्तालाप करताना नरेंद्र पाटील यांनी चव्हाणांसह महाविकास आघाडी सरकारच्या मराठा आरक्षण धोरणावर टीकास्त्र सोडले.

नरेंद्र पाटील - मराठा आरक्षण
गडी खूप ताठर,ऐकतच नाही!

मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण खूप ताठर आहेत. गडी ऐकतच नाही. त्यांनी मराठा क्रांती मोर्चाशी कधीही समन्वय ठेवला नाही. वास्तविक आम्ही एकनाथ शिंदे यांची मागणी सुरुवाती पासून केली होती, त्यांनी मागील युती सरकार मध्ये चंद्रकांतदादा पाटील यांच्या सोबत या प्रश्नावर काम केले होते. त्यांना त्याचा अनुभव होता. मात्र, अशोक चव्हाण यांच्यामुळे मराठा समाजाचे खरे नुकसान झाले असल्याचा आरोपही पाटील यांनी यावेळी केला.

राज्यभर तहसील समोर बेमुदत ठिय्या आंदोलन करा-

यावेळी मराठा समाजाला उद्देशून बोलताना पाटील म्हणाले की, यांनी समाज सध्या सुस्त झाला आहे. मराठा क्रांती मोर्चा वेळी समाज पक्षीय भेदाभेद विसरून एकत्र आला, या दरम्यान बेचाळीस मराठा युवकांनी या लढ्यासाठी आपले बलिदान दिले. फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचा कायदा केल्यानंतर समाज सुस्त पडला. मात्र आता आताच्या राज्य सरकारवर दबाव वाढवण्याची गरज असून पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली आहे. तुमच्या जिल्ह्यातील मंत्री, आमदार यांच्यावर दबाव वाढवा. पक्ष,गट-तट बाजूला ठेवून समाजासाठी पुन्हा एकत्र या. मंत्री-आमदार या प्रश्नात लक्ष घालत नसतील तर तालुक्याच्या तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलने सुरू करा. कोरोना संसर्ग असल्याने रोज एका गावातील पाच ते दहा लोकांनी ठिय्या आंदोलन करून गावाच्या वतीने सरकारला मराठा आरक्षणासाठी निवेदने पाठवा. तालुक्याच्या प्रत्येक गावाने एक-एक करत रोज ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदवल्यास सरकारवर आपोआप दबाव वाढेल. यासाठी आपण राज्यभर फिरत असून ज्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी घटनेने मराठा समाजात संतापाची लाट निर्माण होऊन पुढे आरक्षणासाठीचे जनआंदोलन उभे राहिले, त्या जिल्ह्यातूनच आता पुन्हा दबाव वाढवायला हवा. कारण जिल्ह्यात तीन मंत्री असून ते सर्व मराठा समाजाचे आहेत,असे आवाहनही केले.

जालना-साताऱ्यात ठिय्या आंदोलन सुरू-

पाटील यांनी सांगितले की जालना जिल्ह्यातील शास्ती पिंपळगाव तसेच सातारा जिल्ह्यातील पाटण, खंडाळा या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू असून रोज तालुक्यातील एका गावातील पाच ते दहा मराठा समाजाचे नागरिक आंदोलनात सहभागी होऊन गावाच्या वतीने तहसीलदारांमार्फत सरकारला निवेदन पाठवत आहेत. जर इतर समाज आपल्या न्यायहक्कांसाठी एकत्र येत येत सरकारवर दबाव वाढवत असेल तर मराठा समाजानेही आपल्या न्याय मागण्यासाठी दबाव वाढवणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आरक्षणावर शांत-

सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मात्र राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण मुद्यावर चकार शब्द काढला नाही. आम्हाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या, कारण त्यांनी नारायण राणे यांना समितीचे अध्यक्ष करताना महत्वाची भूमिका घेतली होती. मात्र अजित पावरही सभागृहात यावर काही बोलले नाहीत याबद्दल नरेंद्र पाटील यांनी खंत व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.