ETV Bharat / state

गुरुपौर्णिमा : साईबाबांना गुरु मानणाऱ्या भक्तांची शिर्डीत मांदियाळी - tyatya kote patil

तीन दिवस चालणाऱ्या या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला १९०८ साली साईबाबांच्या अनुमतीने सुरू करण्यात आले होते. साईबाबांचे परमभक्त तात्यासाहेब नुलकर व तात्या कोते पाटील तसेच काही भक्तांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईबाबांना आपले गुरु मानून त्यांची पूजा केली होती.

शिर्डी साई बाबा
author img

By

Published : Jul 16, 2019, 12:48 PM IST

Updated : Jul 16, 2019, 12:57 PM IST

अहमदनगर- शिर्डीमध्ये तीन दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाची आज मोठ्या धूम धडाक्यात सुरुवात झाली आहे. साईबाबांना आपले गुरु मानणारे लाखो भक्त आज शिर्डीत बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन आज प्रत्येक भक्त स्वत:ला धन्य मानत आहे.

तीन दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला १९०८ साली साईबाबांच्या अनुमतीने सुरू करण्यात आले होते. साईबाबांचे परमभक्त तात्यासाहेब नुलकर व तात्या कोते पाटील तसेच काही भक्तांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईबाबांना आपले गुरु मानून त्यांची पूजा केली होती. त्यावेळीपासून शिर्डीमध्ये व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा या उत्सवाला सुरुवात झाली. आज सकाळच्या काकड आरतीनंतर साईंची प्रतिमा, वीणा आणि साईसच्चरित ग्रंथांची मिरवणूक साई मंदिरापासून ते साईंच्या व्दारकामाई मंदिरापर्यंत नेण्यात आली. त्यानंतर व्दारकामाईत अखंड पारायणाचे वाचन करुन मिरवणुकीला गुरूस्थान मंदिराच्या मार्ग समाधी मंदिरात आणण्यात आले. आणि त्यानंतर आजच्या गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवसाची सुरुवात झाली.

साईबाबांच्या शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यासाठी आज देशाच्या काना-कोपऱ्यातून लाखो भक्त आले होते. पुणे, मुंबई, नाशिक आदी ठिकाणच्या शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. १९०८ साली सुरू झालेल्या या गुरुपौर्णिमेच्या उत्सवला आज १११ वर्ष पूर्ण झाली आहेत.

साई संस्थानाकडून गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी साई समाधी मंदिराला रात्रभर भाविकांच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात येते. मात्र, आज रात्री चंद्र ग्रहण असल्याने शेजारती नंतर साईबाबांचे मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याचे साई संस्थान कडून सांगण्यात आले आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_साईबाबाच्या शिर्डी मधे तीन दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाची आज मोठ्या धूम धडाक्यात सुरुवात झाली आहे,साईबाबाना आपले गुरु मानणारे लाखो भक्त आज शिर्डी मधे साई समाधीचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहे....साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेऊन प्रत्यक भक्त आज स्वताला धन्य मानत आहे….

VO_ गुरुपौर्णिमाला व्यास पौर्णिमा पण म्हणल्या जात.सन १९०८ साली साईबाबाच्या अनुमतिने या गुरुपौर्णिमा उत्सवला सुरुवात झाली साईबाबाचे परमभक्त तात्यासाहेब नूलकर,तात्या कोते पाटील आणि काही भक्तांनी व्यास पौर्णिमेच्या दिवशी साईबाबाना आपले गुरु मानून पूजा केली आणि त्यावेळी पासून शिर्डी मधे व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा या उत्सवला सुरुवात झाली….आज सकाळच्या काकड आरतीनंतर साई मंदिरापासुन.साईंची प्रतीमा,विणा आणि साईसच्चरीत्र ग्रंथांची मिरवणूक साईंच्या व्दारकामाई पर्यंत नेण्यात आली.व्दारकामाईत अखंड पारायणाच वाचन करुन मिरवणूक गुरूस्थान मंदिराच्या मार्ग समाधी मंदिरात आणण्यात आली आणि आजच्या गुरुपोर्णिमा उत्सवच्या मुख्य दिवसाची सुरुवात झाली….साईबाबाच्या शिर्डी मधे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यासाठी देशाच्या कान्या कोपऱ्यातुन आज लाखो भक्त आले असून पूणे , मुंबई , नासिक आदी ठिकाणच्या शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत,सन १९०८ साली साईबाबाच्या अनुमति ने सुरु झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवला आज 111 वर्षा पूर्ण झाले आहे.....

BITE_बाळकृष्ण जोशी, साई मंदिर पुजारी

VO_गृरुपोर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवसी रात्रभर साई समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी साई संस्थान कडून खुले ठेवण्यात येते मात्र आज रात्री चंद्र ग्रहण असल्याने आज रात्रीच्या शेजारती नंतर साईबाबांचे मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याच साई संस्थान कडून सांगण्यात आले आहे....Body:MH_AHM_Shirdi_Gurupornima Festival Man Day_16_Visuals_Bite_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi_Gurupornima Festival Man Day_16_Visuals_Bite_MH10010
Last Updated : Jul 16, 2019, 12:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.