ETV Bharat / state

Leopards Found In Ghargaon : घारगाव परिसरात बिबट्यांचं दिवसाही होतंय दर्शन; परिसरात दहशतीचे वातावरण - शेतकरी वर्गाची मागणी

Leopards Found In Ghargaon : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगांव गावा अंतर्गत (Terror of leopards in Ghargaon) असणाऱ्या कळमजाई रोडवरील शेख वस्ती परिसरात आज सकाळी दिवसा बिबटे मुक्त संचार (movement of leopards during day) करत असताना आढळले. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (farmers scared due to leopards)

Leopards Found In Ghargaon
बिबट्यांचे दिवसाही होतंय दर्शन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2023, 7:48 PM IST

बिबट्याच्या अस्तित्वाविषयी माहिती देताना शेतकरी

अहमदनगर Leopards Found In Ghargaon : या वर्षी पाऊस न झाल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जंगल, डोंगर दऱ्यांमध्ये पाणी उपलब्ध नसल्याने बिबट्यांनी अन्न व पाण्यासाठी बागायती भागातील ऊसाच्या क्षेत्रांचा निवारा शोधला आहे. शेख वस्ती परिसरात दोन बिबटे राहत असून दिवसाही ते कळमजाई परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बसलेले असतात व परिसरात मुक्त संचार करताना तेथील नागरिकांना दिसत आहेत. बाळंदरी व परिसरातील अनेक लहान लहान मुले शाळेसाठी या रस्त्याने ये-जा करतात. तसेच शेतकऱ्यांनाही एकट्याने शेतात जाणे जोखमीचे झाले आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा काही अघटीत घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.

शेतकरी वर्गाची मागणी : या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असल्याने कळमजाई रस्ता हा वर्दळीचा रस्ता आहे. त्यातच बिबटेही याच परिसरात ठाण मांडून बसल्याने वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबटे जेरबंद करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.

वनविभागाचे दुर्लक्ष : बिबट्यांचा दिवसाढवळ्या मुक्त संचार असल्याचा व्हिडिओ स्थानिकांनी काढला आहे. या व्हिडिओत बिबट्या शेताच्या बांधावरून अगदी बिंधास्तपणे एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाताना दिसत आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने ओढे, नाले कोरडे आहेत. वन परिक्षेत्रात जंगली प्राण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने ते मानवी वस्तीकडे येत आहेत. वनविभागाने ठिकठिकाणी पाण्याची सोय करणे गरजेचे असताना वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले असल्याचं स्थानिक शेतकरी जावेद शेख म्हणाले.

इतर जिल्ह्यातही बिबट्यांची दहशत : अहमदनगर प्रमाणे इतर जिल्ह्यातही बिबट्यांची दहशत वाढली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यातील शिंगी पिंपरी शिवारात बिबट्याचा वावर वाढला होता. येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील शेळ्यांच्या गोठ्यात बिबट्या शिरला. शेळीची शिकार करुन त्यावर ताव मारण्यात गुंतलेल्या बिबट्याला शेतकऱ्याने गोठ्यात कोंडले. परंतु वनविभागाच्या ढिसाळ कामामुळे जेरबंद झालेला बिबट्या पळून जाण्यात यशस्वी झाला.

तावडीत आलेला बिबट्या पळाला : एका शेतकऱ्याने शक्कल लढवून बिबट्याला गोठ्यात कोंडले. तब्बल 3 तास बिबट्या गोठ्यात जेरबंद होता. त्याला बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी बिबट्याला पकडू लागले. परंतु त्यांच्या ढिसाळ तयारीमुळे बिबट्याने तेथून पलायन केले.

हेही वाचा:

  1. Leopard Got Stuck In Chicken Coop: बिबट्या कोंबड्यांची शिकार करायला गेला अन् अडकला खुराड्यात
  2. leopard video : पिंजऱ्यात असूनही बिबट्याची दहशत; डरकाळी फोडत नागरिकांवर धावून जाण्याचा प्रयत्न...पाहा व्हिडिओ
  3. leopards entered In village: बिबट्या आला रे आला! गावात घुसले तब्बल तीन बिबटे, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.