ETV Bharat / state

VIDEO : शेत नांगरतानाच समोर बिबट्या..!

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये बिबट्याने भरदिवसा दर्शन दिले आहे. दवणगाव येथील शेतकरी वैभव कासार या तरुणाच्या शेतात बिबट्या बराच वेळ भक्ष्य शोधत फिरत होता. त्याच्या हालचालींचे चित्रीकरण वैभव यांनी आपल्या मोबाईलमध्ये केले आहे.

author img

By

Published : Nov 21, 2020, 8:04 PM IST

RAHURI LEOPARD IN FARM
राहुरी बिबट्या दर्शन

अहमदनगर - दवणगाव येथील शेतकरी वैभव कासार या तरुणाच्या शेतात भरदिवसा बिबट्याने दर्शन दिले आहे. संपूर्ण जिल्ह्यात बिबट्याची दहशत पसरली आहे. राहुरी तालुक्यातील प्रवरा नदी काठावरील आंबी, अंमळनेर, दवणगाव, केसापूर या गावात बिबट्याची दहशत कायम आहे. दवणगाव येथील शेतकरी वैभव कासार या तरुणाच्या शेतात भरदिवसा बिबट्याने दर्शन दिले आहे. हा बिबट्या दीड एकराची नांगरट होईपर्यंत त्या टॅक्टरभोवती भक्ष्य शोधण्यासाठी फिरत होता. परंतु वैभव कासार यांनी धाडसाने टॅक्टरची नांगरट चालूच ठेवून आपली सुटका करून घेतली. सोबतच मोबाईलमध्ये बिबट्याच्या हालचालींचे चित्रीकरण ही आपल्या कैद केले आहे.

राहुरी बिबट्या दर्शन

हेही वाचा - कोरोना अन् शाळा... कधी वाजणार घंटा? 'ईटीव्ही भारत'चा आढावा

वनविभागाला केव्हा जाग येणार?

राहुरी तालुक्यातील प्रवरा नदी काठावरील आंबी, अमळनेर, दवणगाव, केसापूर या परिसरात पूर्वी बिबट्याने एका चिमुकलीवर हल्ला केला होता. तसेच शेळ्या आणि गुरा वासरावरही बिबट्या सतत हल्ला करत आहे. मात्र आता दिवसाढवळ्या बिबट्या दर्शन देत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी भीतीपोटी आपली शेतीची कामे थांबवली तर काही जण जीव धोक्यात घालून काम करत आहेत. मात्र वन विभाग याकडे अजिबात लक्ष देत नाही, एखाद्या व्यक्तीवर हल्ला झाल्यानंतर वन खात्याला जाग येईल का? असा संतप्त शेतकरी करत आहे. लवकरात लवकर परिसरात पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहे.

हेही वाचा - 'लव्ह जिहाद भाजपा नेत्यांच्या मुला-मुलींना लागू होता का, ज्यांनी दुसऱ्या धर्मात लग्न केलयं'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.