शिर्डी (अहमदनगर) - श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्तीत सकाळी बिबट्या घुसला आणि एकच गोंधळ उडाला. त्यानंतर बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. या दरम्यान बिबट्याने नागरिकांवर हल्ला करण्यास (leopard attack in Ahmednagar ) सुरवात केली. यात एका 11 वर्षीच्या मुलीसह एकूण सात नागरिक जखमी झाले आहेत. त्यात एका वन रक्षकांचाही समावेश आहे. मोरगे वस्तीत अनेक गल्ल्या एकमेकांना खेटून असल्याने बिबट्या परिसरात सैरावैरा पळत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्मीण झाले होत. या परिसरात असलेल्या क्लासला आलेल्या एका 11 वर्षीय मुलीवरही बिबट्याने हल्ला केला. त्यानंतर तो लपण्यासाठी जागा शोधत असताना परिसरातील आणखी पाच जणांवर बिबट्याने हल्ला केला. ( Leopard in Cage) बिबट्याने हल्ला करतानाचा थरार अनेकांनी पाहिला. तर अनेक जण तो मोबाईलमध्ये कैद करण्यास धडपडत होते.
Leopard in Cage : नगरमध्ये नागरीवस्तीत घुसलेला बिबट्या अखेर जेरबंद, तीन तासांच्या प्रयत्नांनंतर वनविभागाला यश - अहमदनगरमध्ये बिबट्या अखेर जेरबंद
श्रीरामपुर शहरातील मोरगे वस्ती परिसरात सदावर्ते हॉस्पिटल रोडवरील नागरी वस्तीत घुसलेल्या बिबट्याने वन रक्षकासह सात जणांना जखमी केले. (leopard attack in Ahmednagar ) त्यानंतर तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात ( Leopard in Cage) वन विभागाला यश आले आहे.
![Leopard in Cage : नगरमध्ये नागरीवस्तीत घुसलेला बिबट्या अखेर जेरबंद, तीन तासांच्या प्रयत्नांनंतर वनविभागाला यश leopard in cage](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13824316-197-13824316-1638705334101.jpg?imwidth=3840)