शिर्डी - वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याने खळबळ उडाली. ही घटना कोल्हार-घोटी राज्यमार्गावर कसारवाडी शिवारात शनिवारी सकाळी घडली. रात्रीच्या वेळी वाहनाच्या धडकेत बिबट्यांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढल्याने वन्यजीव प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
वाहनाने धडक दिल्यानंतर बिबट्या महामार्गाच्या कडेला असलेल्या डाळिंबाच्या बागेत जाऊन पडला. त्यानंतर त्याने तिथेच प्राण सोडला. पुणे-नाशिक महामार्ग आणि कोल्हार-घोटी राज्यमार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या धडकेमुळे बिबटे मृयtमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.