ETV Bharat / state

'तो' झालायं लहानग्यांचा खराखुरा 'बगिरा'

जिल्ह्याच्या उत्तर भागात खाण्यासाठी आणि राहण्यासाठी मुबलक प्रमाणात असल्यामुळे या भागात बिबट्यांची संख्या जास्त आहे. दररोज बिबट्याने हल्ला केल्याचा किंवा बिबट्या नजरेस पडल्याची बातमी मिळते. शिर्डी जवळ शिर्डी-शिंगवे मार्गावरील वस्तीवर एक बिबट्याचे पिल्लू मुलांसोबत खेळताना दिसतो.

Leopard Cub
मुलांसोबत खेळताना बिबट्याचे पिल्लू
author img

By

Published : Feb 20, 2020, 4:58 PM IST

Updated : Feb 20, 2020, 9:21 PM IST

अहमदनगर - 'जंगलबुक' सिनेमात मोगली आणि बगिराची मैत्री पाहून दर्शकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. शिर्डी जवळ शिर्डी-शिंगवे मार्गावरील वस्तीवर असाच एक बिबट्या मुलांसोबत खेळताना दिसतो.

'तो' झालायं लहानग्यांचा खराखुरा 'बगिरा'

जिल्ह्याच्या उत्तर भागात खाण्यासाठी आणि राहण्यासाठी मुबलक प्रमाणात असल्यामुळे या भागात बिबट्यांची संख्या जास्त आहे. दररोज बिबट्याने हल्ला केल्याचा किंवा बिबट्या नजरेस पडल्याची बातमी मिळते. बिबट्या पाळीव प्राण्यांवर आणि मनुष्यावर हल्ला करत असल्याने ग्रामीण भागात बिबट्यांची दहशत आहे. मात्र, शिर्डीजवळच्या वस्तीवर एका बिबट्याच्या पिल्लाचा लहान मुलांचा लळा लागला आहे. वस्तीवर बिबट्याचे एक पिल्लू दररोज येते आणि लहान मुलांसोबत मनसोक्त खेळते. ही मुलेही त्याला मित्राप्रमाणे गोंजारतात, त्याच्या सोबत खेळतात आणि त्याची काळजी घेतात. या मुलांनी त्याचे नाव 'बगिरा' ठेवले आहे.

हेही वाचा - तुकाराम मुंढेंनी घेतली पालिका कर्मचाऱ्यांची 'शाळा'

या पिल्लाची आई हल्ला करेल म्हणून सुरुवातीला या पिल्लाजवळ जाण्यासाठी सर्वांना भीती वाटत होती. मात्र, हे पिल्लू दररोजच घराजवळ येवून खेळु लागल्याने सगळ्यांना त्याची सवय झाली आहे. या पिल्लाबरोबर त्याची आई नसते. मात्र, ती रात्री त्या परिसरात येवून त्याच्या बरोबर राहात असल्याचे रहिवाशी सांगतात.

Last Updated : Feb 20, 2020, 9:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.