ETV Bharat / state

अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याचा मुक्तसंचार, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण - Ahmednagar District News

अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला आहे. गुरुवारी सायंकाळी शिरापूरमध्ये बिबट्याने एका लहान मुलावर हल्ला केला होता. ही घटना ताजी असतानाच, आता शिर्डी जवळील नांदुर्खीमध्ये बिबट्याने एका पाळीव कुत्र्यावर झडप घालून त्याला ठार केले आहे. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.

Leopard attacks dog
अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याची दहशत
author img

By

Published : Oct 30, 2020, 10:59 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला आहे. गुरुवारी सायंकाळी शिरापूरमध्ये बिबट्याने एका लहान मुलावर हल्ला केला होता. ही घटना ताजी असतानाच, आता शिर्डी जवळील नांदुर्खीमध्ये बिबट्याने एका पाळीव कुत्र्यावर झडप घालून त्याला ठार केले आहे. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याची दहशत

गुरुवारी सायंकाळी शिरापूर येथील संजय मुरलीधर बुधवंत यांच्या साडेचार वर्षांच्या मुलाला आईसमोरून बिबट्याने उचलून नेले. घटना घडल्यानंतर वनविभागासह उपस्थित नागरिकांनी बिबट्याचा पाठलाग करत चिमुकल्याला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्व प्रयत्न अपयशी ठरले. अखेर त्या बिबट्याने चिमुकल्याचा जीव घेतला. ही घटना ताजी असतानाच आज शिर्डी जवळील नांदुर्खीमध्ये पहाटेच्या सुमारास बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करत त्याला ठार केले. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदुर्खी गावात मोठ्या प्रमाणात ऊसाचे पीक घेतले जाते, त्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी जागा मिळते. त्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे.

दरम्यान या बिबट्याला पकडण्याची मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे. ज्या ज्या परिसरात आतापर्यंत बिबट्याचा वावर आढळला आहे, अशा दहा ठिकाणी पिंजरे लावण्यात आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.