ETV Bharat / state

बिबट्याच्या हल्यात महिला जखमी, दिव्यांग पतीने वाचवले पत्नीचे प्राण - महिलेवर बिबट्याचा हल्ला

पाथर्डी तालुक्यात एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला. यात महिला गंभीर जखमी झाली. विशेष म्हणजे, तिच्या दिव्यांग पतीने प्रसंगावधान दाखवत तिचे प्राण वाचवले आहेत.

Woman injured in leopard attack
पाथर्डी तालुक्यात महिलेवर बिबट्याचा हल्ला
author img

By

Published : Nov 23, 2020, 12:15 PM IST

अहमदनगर - पाथर्डी तालुक्यातील भगवानगड लमाण तांडा येथे एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. छ्बुबाई एकनाथ राठोड असे या महिलेचे नाव आहे. त्यांच्या दिव्यांग पतीच्या प्रसंगावधानामुळे महिलेचे प्राण वाचले आहेत.

दिव्यांग पतीने वाचवले प्राण

छबुबाई या शेतात काम करत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी त्यांचे दिव्यांग पती एकनाथ दासू राठोड हे देखील त्यांच्या जवळपासच होते. बिबट्याने हल्ला केल्याचे समजताच त्यांनी बिबट्याला काठीने मारत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी बिबट्याने त्यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावर पंजा मारला. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबत माहिती मिळताच गावातील युवकांनी त्यांना खरवंडी कासार येथील दीपक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी बिबट्याचा शोध घेण्यासाठी पिंजरा घेऊन निघाले आहेत.

हेही वाचा - सोलापूर:ऊसदरावरून स्वाभिमानीचे 'रास्तारोको' आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.