अहमदनगर - कोपरगाव शहरात आलेल्या पुरामुळे दुकान आणि टपरीधारकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई द्यावी यासाठी कोपरगाव शहरातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांनी तहसीलदार व आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
पुरामुळे कोपरगाव शहरातील ३८५ दुकानांमध्ये पाणी घुसून दुकानातील माल, फर्निचर भिजल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ते पुन्हा वापरण्यायोग्य राहिले नाही. यामुळे व्यापाऱ्यांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. सर्व दुकानांचा सर्वे झाला असूनही अजून कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. ही मदत लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले.