ETV Bharat / state

किसान सभा 17 जूनला राज्यातील तहसील कार्यालयांवर काढणार मोर्चा - डॉ. अजित नवले

टाळेबंदीच्या काळात दूधाची मागणी घटल्याचे कारण पुढे करत करत ज्या खाजगी व सहकारी दूध संघांनी, दूध खरेदीचे दर कमी केले त्या सर्व दूध संघांचे ऑडिट करा, प्रत्यक्षात दुधाची मागणी किती घटली होती व त्याप्रमाणात किती दर कमी देण्यात आले, याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी डॉ. अजित नवले यांनी केली.

kisan sabha decide to hold agitation on 16 jun in all tehsil offices in state
किसान सभा 17 जूनला राज्यातील तहसील कार्यालयावर काढणार मोर्चा - डॉ. अजित नवले
author img

By

Published : Jun 14, 2021, 4:05 PM IST

अहमदनगर - टाळेबंदीचा गैरफायदा घेत दूध उत्पादक शेतकऱ्यांची खासगी व सहकारी दूध संघाकडून मोठी लूटमार करण्यात आली आहे. टाळेबंदीच्या काळात मागणी कमी झाल्याचे कारण देत खासगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर दहा ते पंधरा रुपये प्रति लिटर केले. ग्राहकांसाठीचे विक्रीदर मात्र तसेच ठेवत शेतकरी व ग्राहकांची प्रचंड लूटमार केली. या बाबीकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 17 जूनला राज्यभरातील तहसील कार्यालयांवर मोर्चे काढण्याचा निर्णय किसान सभेच्या राज्य कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अजित नवले यांनी दिली.

माहिती देताना किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अजित नवले

खासगी व सहकारी दूध संघांचे ऑडिट करा - डॉ. अजित नवले

टाळेबंदीच्या काळात दूधाची मागणी घटल्याचे कारण पुढे करत करत ज्या खाजगी व सहकारी दूध संघांनी, दूध खरेदीचे दर कमी केले त्या सर्व दूध संघांचे ऑडिट करा, प्रत्यक्षात दुधाची मागणी किती घटली होती व त्याप्रमाणात किती दर कमी देण्यात आले, याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी, परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या खासगी व सहकारी दूध संघांवर कठोर कारवाई करा, केलेली लूटमार वसूल करून ती शेतकऱ्यांना परत करा, आगामी काळात अशा प्रकारची लूटमार करता येणार नाही यासाठी खासगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा कायदा करा, दूध व्यवसायाला साखर व्यवसायाप्रमाणे रेव्हेन्यू शेअरींग व किमान हमी दर असे दुहेरी संरक्षण लागू करण्याची मागणी डॉ. अजित नवले यांनी केली.

आंदोलनात सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

खरीप हंगामाच्या तयारीसाठी राज्यभर सर्वत्र पुरेसे खत, दर्जेदार बियाणे, शून्य व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्या, नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना संरक्षण मिळण्यासाठी विमा योजनेची सक्षम व पारदर्शक अंमलबजावणी करा, लॉकडाऊनच्या काळात थकलेली वीजबिले विनाशर्त माफ करा, आदिवासी शेतकऱ्यांना खावटी अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे मात्र अद्यापही राज्यभरातील लाखो आदिवासी शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेले नाही. ते अनुदान सर्व श्रमिक आदिवासींना तातडीने द्या, वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीला सर्वत्र चालना द्या, वृद्ध, अपंग, निराधार, विधवा, परित्यक्ता यांना लॉकडाउन काळात अतिरिक्त 1 हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती, याची अंमलबजावणी करा व या योजनेअंतर्गत देण्यात येणारे अनुदान किमान 3 हजार रुपयांपर्यंत वाढवा, कोरोना महामारीचे संकट अद्यापही संपलेले नसल्याने, सर्वत्र पुरेशा आरोग्य व्यवस्था शासकीय यंत्रणेमार्फत उपलब्ध करा आणि सर्वांचे मोफत व त्वरित लसीकरण करावे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांनी हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांनी केले आहे.

हेही वाचा - काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार नाना पटोले असतील का?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.