ETV Bharat / state

Kirit Somaiya Critisize Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची आलिबाबा चाळीस चोरांची टीम; सोमैयांचा राज्य सरकारवर घणाघात - किरीट सोमैया शिर्डी पत्रकार परिषद

भाजपानेते किरीट सोमैया ( BJP Leader Kirit Somaiya In Shirdi ) यांनी आज सकाळी शिर्डीला येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. घोटाळा मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प यावेळी सोमैया यांनी साईबाबांच्या चरणी केली आहे. त्यानंतर आयोजीत पत्रकार परीषदेत सोमैयांनी ( Kirit Somaiya Shirdi Press Conference ) शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांवर जोरदार टीका ( Kirit Somaiya Critisize NCP Leader ) केली.

BJP Leader Kirit Somaiya In Shirdi
BJP Leader Kirit Somaiya In Shirdi
author img

By

Published : Dec 20, 2021, 6:40 PM IST

Updated : Dec 20, 2021, 8:23 PM IST

अहमदनगर - भाजपानेते किरीट सोमैया ( BJP Leader Kirit Somaiya In Shirdi ) यांनी आज सकाळी शिर्डीला येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. घोटाळा मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प यावेळी सोमैया यांनी साईबाबांच्या चरणी केली आहे. त्यानंतर आयोजीत पत्रकार परीषदेत सोमैयांनी ( Kirit Somaiya Shirdi Press Conference ) शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांवर जोरदार टीका ( Kirit Somaiya Critisize NCP Leader ) केली.

प्रतिक्रिया
  • ठाकरेंची आलिबाबा चाळीस चोरांची टीम -

उद्धव ठाकरे यांची आलिबाबा चाळीस चोरांची टीम असून त्या सगळ्या चाळीस चोरांना रोज स्वप्नांत त्यांनी लूट केलेल्या मालाचा हिशोब कोणी घेण्यासाठी घरी येणार का, याची भीती वाटत असेल. ज्यांनी चोरी आणि लबाडी केली आहे. त्यांच्यावर कारवाई होणारच असल्याचे सोमैया म्हणाले आहे.

  • नवाब मलिकांच्या ट्वीटवर सोमैयांचा टोला -

काल नवाब मलिकांना आज माझ्या घरी पाहुणे येणार असल्याचे ट्वीट केले होते. त्यांना चोरी केलेल्या मालाचा हिशोब कोणी घेण्यासाठी घरी येणार का याची भीती वाटत असेल, असा टोला लगावत ज्यांनी चोरी केली आहे, त्याच्यावर कारवाई होणारच, असे सोमैया म्हणाले.

  • साखर कारखाने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हडपले -

मी आज शिर्डीत येऊन साईबाबांचा आशीर्वाद घेतल्याने माझ्या कामाला अजून गती मिळणार आहे. नगर जिल्ह्यातील मंत्री असलेले प्राजक्त तनपुरे यांनी राम गणेश गडकरी साखर कारखाना शरद पवारांच्या मार्गदर्शना खाली बेनामी पद्धतीने घेतला आहे. कारखान्याची जमीन अनिल देशमुखांना हस्तांतरित केली गेली. हे काय गौडबंगाल आहे. याची चौकशी सुरू आहे. त्यातून सत्य बाहेर येईलच. महाराष्ट्रात शरद पवारांच्या आशीर्वादाने लाखो शेतकऱ्यांचे सहकारी साखर कारखाने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हडप केल्याचा आरोपही किरीट सोमैया यांनी केला.

  • ठाकरे सरकारच्या मंत्रांचे कारनामे -

ठाकरे सरकारच्या आणखीन एका मंत्र्याची चौकशी सुरू आहे. या राज्याचे मुख्यमंत्रीच घरी बसून आहेत, असे नाही. तर या सरकारचे सगळेच मंत्री कोमामध्ये गेल्याच सोमैया म्हणाले. उद्धव ठाकरेंचे सगळे मंत्री पैसे मोजण्यात व्यस्थ आहेत. या सरकारचे एसटी संपाकडे लक्ष नाही, विजेचे गौडबंगाल सुरू असून शेतकरी हैराण आहे.

  • 'ठाकरे सरकार उद्धट सरकार' -

गुलाबराव पाटलांनी हेमा मालिनी विषयी केलेल्या वक्तव्यावर सोमैया यांनी टीका करत उद्धव ठाकरे यांचे सरकार 'उद्धट सरकार' आहे. यांच्या मंत्र्यांचे कारनामे बघा. एक जण शंभर कोटीच्या वसुलीमध्ये जेलमध्ये आहे. दुसरा कार्यकर्त्यांचे अपहरण करतो, म्हणून बेलवर आहे. तिसरा मंत्री नऊशे अंशी कोटी बँक घोटाळा प्रकरणी आनंदराव अडसूळवर वारंट असून साडे तीन महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये बसून आहे. बेकायदेशीर रिसॉर्ट बांधण्यात अनिल परब व्यस्थ आहे. ही स्थिती ठाकरे सरकारची असल्याची घणाघाती टीका भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केली.

हेही वाचा - Subhash Desai Attacked Amit Shah : केंद्र व गुजरातकडून महाराष्ट्राचे वैभव पळवण्याचा प्रकार -सुभाष देसाई

Last Updated : Dec 20, 2021, 8:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.