शिर्डी (अहमदनगर) - ज्येष्ठ तमाशा कलावंत श्रीमती कांताबाई सातारकर यांच्या निधनान कलाक्षेत्राची अपरिमीत हानी झाली आहे. पारंपरिक कलेची जोपासना करणाऱ्या तमाशा सम्राज्ञीस महाराष्ट्र मुकला असल्याची प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे.
अतिशय खडतर आणि संघर्षमय आशा वाटचालीतून तमाशा कलेची जोपासना करून कांताबाईनी अवघ्या ग्रामीण महाराष्ट्राला आनंद मिळवून देताना स्वतःचे दु:ख कधी जाणवू दिले नाही. कांताबाईसह कुटुंबियांनी या कला क्षेत्रात स्वतःला झोकून देताना सहकारी कलावंताना कौटुंबिक मायेने त्यांनी आधार दिला. पारंपरिक कलेला जिवंत ठेवण्याचे केलेले काम नगर जिल्ह्य़ाचा नावलौकीक वाढविण्यास कारणीभूत ठरले.
कलाक्षेत्रातील त्यांच्या या योगदानाचा गौरव म्हणून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय कलागौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्याचे भाग्य प्रवरा परिवाराला मिळाल्याची आठवण विखे पाटील यांनी आवर्जून सांगितली.
कांताबाई सातारकर यांच्या निधनान कलाक्षेत्राची अपरिमीत हानी - विखे पाटील
ज्येष्ठ तमाशा कलावंत श्रीमती कांताबाई सातारकर यांच्या निधनान कलाक्षेत्राची अपरिमीत हानी झाली आहे. पारंपरिक कलेची जोपासना करणाऱ्या तमाशा सम्राज्ञीस महाराष्ट्र मुकला असल्याची प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे.