ETV Bharat / state

Shirdi Kakad Aarti Without Loudspeaker : शिर्डीतील साई मंदिरात विना लाऊडस्पीकर काकडआरती - भोंग्याविना शिर्डी काकड आरती

भोंगावाद आणि त्याच बरोबरीने सुप्रीम कोर्टाचे निर्देशामुळे ( Supreme Court Orders On Loudspeaker ) तीन तारखेच्या रात्री पासून साई मंदिराचे लाऊडस्पीकर बंद करण्यात आले आहेत. गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासात प्रथमच साईबाबा मंदिरातील रात्रीची ( Sai Temple Kakad Aarti ) व सकाळची आरती झाली. परंतु यावेळी स्पिकरचा वापर ( Shirdi Kakad Aarti Without Loudspeaker ) केला गेला नाही.

Supreme Court Orders On Loudspeaker
Supreme Court Orders On Loudspeaker
author img

By

Published : May 4, 2022, 5:08 PM IST

Updated : May 4, 2022, 8:36 PM IST

अहमदनगर - भोंगावाद आणि त्याच बरोबरीने सुप्रीम कोर्टाचे निर्देशामुळे ( Supreme Court Orders On Loudspeaker ) तीन तारखेच्या रात्री पासून साई मंदिराचे लाऊडस्पीकर बंद करण्यात आले आहेत. गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासात प्रथमच साईबाबा मंदिरातील रात्रीची ( Sai Temple Kakad Aarti ) व सकाळची आरती झाली. परंतु यावेळी स्पिकरचा वापर ( Shirdi Kakad Aarti Without Loudspeaker ) केला गेला नाही. याच बरोबरीने शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत सर्व मशिदीत नमाज झाली. परंतु अजानसाठी कोणीही लाऊडस्पीकरचा वापर केला नसल्याची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया

मशीद-द्वारकामाई एकच - शिर्डीत साईबाबांनी साठ वर्षाहून अधिक काळ वास्तव करत सर्वधर्म समभावाची शिकवण दिली. 'सबका मालिक एक'चा संदेश त्यांनी दिला. शिर्डीतील पडक्या मशिदीत साईंनी धुनी प्रज्वलीत केली. साईबाबांच्या हयातीत मशिदला द्वारकामाई नावाने संबोधिले जाऊ लागले. आजही द्वारकामाईवर रामनवमीच्या दिवशी भगवा आणि केशरी रंग एकत्र अससेला हिंदू मुस्लिमांच्या एकतेचा ध्वज फडकवला जातो.

साई मंदिरातील अनोखी परंपरा - साई मंदिरात दररोज सकाळी 10 च्या सुमारास साईच्या समाधी समोर भाविक एकत्र येऊन समाधीवर फुले वाहतात. साई समाधीच्या उत्तरेकडील बाजुने मुस्लीम तर दक्षिणेकडील बाजुने हिंदू ग्रामस्थांनी उभे राहून फुले वाहत प्रार्थना करण्याची परंपरा ही गेल्या शंभर वर्षाहून अधिक काळापासून सुरु आहे. साईच्या मंदिरात आजही सर्वधर्मीय भक्त माथा टेकतात. शिर्डीत द्वारकामाई अर्थात मशिदीवरही लाऊडस्पीकर असून त्यावरुन साई मंदिरात होणाऱ्या चारही आरत्याचे प्रसारण केले जाते. प्रत्यक्षात साईमंदिरात आरत्यांना उपस्थित राहू न शकणारे हजारो भाविक या आरत्याचाच आवाज ऐकत सहभागी होत असतात.

असा असतो दिनक्रम - साईच्या मंदिरात पहाटे 5.15 वाजता काकड आरती केली जाते. त्यानानंतर सकाळी 5.50 वाजता मंगलस्‍नान व त्‍यानंतर शिर्डी माझे पंढरपूर ही आरती होते. तर रात्री 10 वाजता शेजारती सुरु होते. पूर्वी या आरत्या साईमंदिर आणि परीसरात लावण्यात आलेल्या स्पीकरद्वारे एकवल्या जात होत्या. मात्र, 3 मे ला शिर्डी पोलीसांनी शिर्डीत सर्वधर्म बैठक घेत सूचना दिली होती. पोलिसांचे सूचनेचे पालन करत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार रात्री दहा ते सकाळी 6 पर्यंत मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी नसल्याने साई मंदिरावरील लाऊडस्पीकर वापरु नये, असे आदेश दिल्याने 3 मे ला रात्री साईमंदिरात झालेली शेजआरती आणि 4 मेला पहाटेच्या काकड आरतीसाठी लाऊडस्पीकर वापरण्यत आले नाही. साईमंदिरात असलेल्या स्पीकरवरच या आरत्या प्रसारीत करण्यात आल्या. तसेच कोर्टाच्या आदेशाचे पालन साईमंदिरातही केल जाणार असल्याच साई संस्थानच्या मुख्यकार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी सांगितले आहे. शिर्डीत नेहमीच ऐक्य जपन्याच काम केल जाते. शिर्डीत एकूण 6 मशिद असून 4 मेच्या सकाळची अजान करण्यात आली. मात्र, त्यासाठी ध्वनीक्षेपकांचा वापर केला गेला नाही.

हेही वाचा - Sanjay Raut Allegation on MNS : मनसेचा हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Last Updated : May 4, 2022, 8:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.