शिर्डी ( अहमदनगर) Jitendra Awhad Controversy : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या श्रीरामांबद्दल केलेल्या त्या वक्तव्यावरुन राजकारण चांगलंच तापलंय. भाजपा आणि विरोधकांकडून त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केलं जातंय. अशातच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. माझ्या वक्तव्यामुळं कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो, असं म्हटलंय.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड : वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना आव्हाड म्हणाले, मी कोणतंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही. कालच्या वक्त्याव्याबद्दल कोणाच्या भावना दुखावल्या असतील मी खेद व्यक्त करतो. मी कोणत्याही गुन्ह्याला घाबरत नाही. मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. त्याचं विकृतीकरण करणं माझं काम नाही. पण मी काल जे बोललो, ते ओघात बोलून गेलो. प्रभू श्रीराम ज्याला आम्ही महाराष्ट्रात पांडुरंग हरी म्हणतो. त्या रामाबद्दल बोलताना मी म्हणालो की, ते मांसाहारी होते. हा वाद मला आता वाढवायचा नाही. पण जे याविरोधात उभे राहिले आहेत, त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो. वाल्मिकी रामायणात सहा स्कंद आहेत. त्यातील अयोध्या स्कंदेतील 52 श्लोक 102 आहे. तो मी वाचून दाखवत नाही. कारण मला वाद वाढवायचा नाही, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय.
राम हा बहुजनांचा आहे. राम आमचा आहे तुम्ही त्याचं अपहरण करत आहात. राम राम जे करतात त्यांना त्यांचा राम बाजारात आणायचा. माझा राम ह्रदयात आहे-राष्ट्रवादी ( शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड
आम्हीही अयोध्येला जाणार : आम्हीही रामाचे भक्त आहे. आम्हीही अयोध्येला जाणार असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलंय. रोहित पवार काय बोलतात, त्याच्याकडे मी फार महत्त्व देत नाही. ते अजून लहान आहेत. त्यांची पहिलीच टर्म आहे. मी कुठलाही प्रश्न एकटा लढतो. लढाई करायला किती जण आहेत, हे पाहून उतरलात तर आयुष्यात लढाई होवू शकत नाही. अनेक वक्ते शिबीरात बोलले. ती भूमिका पक्षाची नसते. मी मांडलेली भूमिका पक्षाची नाही. मी जरी पक्षाचा नेता असलो तरी मला विषय दिला होता, असं आव्हाडांनी म्हटलंय.
हेही वाचा :