अहमदनगर ( शिर्डी ) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) आणि मुख्यमत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde )यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढणे चुकीचा आहे कारण मुख्यमंत्री त्यांच्या तब्येतीच्या विचारणीसाठी गेले होते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी दिली. तसेच केंद्र सरकारने अलीकडेच साखर निर्यात बंद केली आहे. यावर बोलताना त्यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. उत्तरप्रदेश मधील साखर कारखान्याच्या फायद्यासाठी समुद्र किनाऱ्यावरील साखर कारखान्यांवर निर्यात बंदी घालून अडचणीत आणले जात आहे. साखर निर्यात बंदी उठवावी यावर आम्ही केंद्र सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे माजी मंत्री जयंत पाटील ( Former Minister Jayant Patil ) यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे आणि शरद पवार भेटीवर काय म्हणाले - शरद पवार आजारी असल्याने त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले होते. त्याचा कोणताही राजकीय अर्थ काढणे चुकीचे असल्याचे, जयंत पाटील यांनी शिर्डीतील राष्ट्रवादी मंथन शिबीरात माध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर वाद मिटू शकतो - कर्नाटक महाराष्ट्र सीमा वाद प्रश्नावर दोन्ही राज्याच्या राज्यपालांची बैठक झाली आहे. महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे दोन्ही मुख्यमंत्री मोदींचे ऐकणारे आहेत. त्यामुळे यावर तोडगा काढण्याची मोदींना संधी आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करतात हे बघुयात, अशी कोपरखिळी जयंत पाटील यांनी लगावली आहे.