ETV Bharat / state

जामखेडच्या 'सख्ये सोबती' व्हाट्सअॅप ग्रुपचा अभिनव उपक्रम; कोविड सेंटरला सव्वा लाखाची मदत

कोरोनाच्या महामारीत मदतीचा हात द्यावा, या उद्देशाने जामखेडच्या सख्ये सोबती व्हाट्स्अॅप ग्रुपने कोविड रूग्णांवर मोफत उपचार करणाऱ्यांसाठी सव्वा लाख रुपयांची मदत केली आहे.

सव्वा लाख रुपयांची मदत देतांना गृपचे सदस्य

author img

By

Published : Apr 27, 2021, 10:18 AM IST

Updated : Apr 27, 2021, 12:19 PM IST

अहमदनगर - कोरोनाच्या महामारीमुळे सध्या सर्वजण त्रस्त आहेत. अनेक रूग्णांच्या उपचारासाठी नातेवाईक वनवन फिरताना दिसत आहेत. कुठे ऑक्सिजन नाही, कुठे बेड नाही, कुठे औषध नाही, तर कुठे इंजेक्शन नाही अशा अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्यांना, अशावेळी एक मदतीचा हात लाख मोलाचा ठरतो. आपणही काही करावे असे मनापासून वाटते, परंतु सुरूवात कशी करावी विचार करत असतांनाच जामखेडच्या सख्ये सोबती व्हाट्स्अॅप गृपचे सह्रदयी असलेले सामाजिक जाणीवा जागे करणारे ‌अॅडमीन जुबेर पठाण यांनी, रमेश गुगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोवीड रूग्णांवर मोफत उपचार करणाऱ्या आरोळे हॉस्पिटलला मदत करण्याचे ग्रुपमध्ये आवाहन केले.

'सख्ये सोबती' वाटस्अप गृपने कोविड सेंटरला केली सव्वा लाखाची मदत..

व्हाट्स्अप गृपमधुन सव्वा लाख रुपये

अन् मदत करण्याची मनोमनी सुप्त इच्छा असणाऱ्या सख्ये सोबती ग्रुपमधील सदस्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या परीने देणे चालू केले. मदतीचा ओघ चालू झाला अन् बघता बघता एकाच व्हाट्स्अॅप गृपमधुन सव्वा लाख रुपये अॅडमीन जूबेर पठाण यांच्याकडे ऑनलाईन पध्दतीने जमा झाले. जमा झालेल्या रकमेची पारदर्शकता अॅडमीनने चोख ठेवली. जामखेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते आरोळे हाॅस्पीटलचे प्रतिनिधी संजय कोल्हे व शहा यांच्याकडे सव्वा लाख रुपयांची रक्कम सुपूर्द केली.

इतर व्हाट्स्अप ग्रुप्सनी आदर्श घ्यावा

आज गावागावात व्हाट्स्अॅप ग्रुप्स आहेत. एखाद्या तालुक्यात पाहिले तरी हजारोच्या संख्येने आणि चित्र-विचित्र नावाचे व्हाट्स्अॅप ग्रुप्स असतात. अनेकदा या ग्रुप्स मधून एकमेकांची टिंगल-टवाळी, कसलीही खात्री न करता चुकीचे मेसेजेस पुढे फॉरवर्ड करणे, अफवा पसरवणे अशा प्रकारचे नको ते उद्योग चालतात. यातून वादविवाद होतात आणि अनेकदा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होतात. हाच संदर्भ घेऊन यावेळी उपस्थित असलेले जामखेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी व्हाट्स्अॅप ग्रुप्सच्या गर्दीत 'सख्ये सोबती' ग्रुपचे वेगळेपण अभिनंदनीय असल्याचे सांगितले. इतर ग्रुप्सनी पण त्यांचा आदर्श घेत समाजोपयोगी काम करावे असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

ग्रुप सदस्यांचे सर्व स्तरावर अभिनंदन

कोविड प्रादुर्भाव असल्याने कसलाही बडेजाव न करता मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत ही मदत पोहच करण्यात आली. सख्ये सोबती व्हाट्स्अॅप गृपचे अॅडमीन जुबेर पठाण, एच.यु गुगळे पतसंस्थेचे व्यवस्थापक वैभव कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक बढे, यूवा नेते प्रविण उगले, संदिप गायकवाड व गृपमधील मोजकेच सदस्य उपस्थित होते. सख्ये सोबती व्हाट्स्अॅप गृपने प्रेरणादायी अभिनव कल्पना अंमलात आणल्यामुळे गृप अॅडमीनसह सर्व सदस्यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.

हेही वाचा - दिलासा! नागपुरात बाधितांच्या तुलनेत बरे झालेले रुग्ण अधिक

Last Updated : Apr 27, 2021, 12:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.