अहमदनगर : परमबीर सिंग आणि अनिल देशमुख यांच्यावरील गुन्हे वेगवेगळे आहेत. परमबीर सिंग शोधुनही सापडत नाही. देशमुखांच्या बाबतीतही तसं दिसतंय. मात्र, देशमुखांना मुद्दाम अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. बाऊ करुन देशमुखांच्या मागे ईडी लावण्यात आली. दुसरीकडे परमबीर सिंगांवर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. पण ते नोटीस घोण्यासाठी उपलब्ध होत नाही अशी स्थिती झाल्याचे पाटील शिर्डीत बोलताना म्हणाले.
...तर कारखाने चालणार नाही
राज्यातील साखर कारखान्यांना इन्कम टॅक्सच्या नोटीस आल्या आहेत. जर कारखान्यांकडून कर वसुल करण्यात आला तर ते चालणार नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे विभागाने त्यांचा करदाता जिवंत राहीला पाहीजे आणि करही वसुल झाला पाहीजे यासाठी मध्यम धोरण स्वीकारलं पाहिजे असे पाटील म्हणाले. असे केले तर काही प्रश्न सुटतील, मात्र कायद्यावर बोट धरुनच झालं तर इन्कम टॅक्स भरावा लागेल आणि काही कारखाने चालणार नाही अशी परीस्थीती झाल्याचे पाटील म्हणाले. काँग्रेसला कायम स्वरुपी अध्यक्ष मिळावा या आजच्या सामनामधील लेखाविषयी बोलताना पाटील म्हणाले की, तो काँग्रेसचा अंतर्गत विषय त्यामुळे त्यांना आम्ही बाहेरुन सल्ला देणारे कोण?
अतिवृष्टीचा फटका
राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. शेतकऱ्यांचे बांध वाहून गेलेत. तर दुसरीकडे जलयुक्त शिवारची चौकशी सुरु आहे. त्यातुन काय ते बाहेर येईल. मात्र अतिवृष्टी झाली हेही नाकारता येणार नाही असे पाटील म्हणाले.
हेही वाचा - परमबीर सिंग यांचे देशाबाहेर पलायन? लंडनला गेल्याची चर्चा?