ETV Bharat / state

रेखा जरे प्रकरणातील आरोपी बाळ बोठेंच्या अवैध संपत्तीची चौकशी करा; मनसेची मागणी

रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार नामांकित वृत्तपत्राचे संपादक बाळ बोठे यांना अटक करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांनी केली आहे.

investigate-the-assets-of-the-accused-bal-bote-in-the-rekha-jare-case-demanded-by-mns
रेखा जरे प्रकरणातील आरोपी बाळ बोठेंच्या अवैध संपत्तीची चौकशी करा; मनसेची मागणी
author img

By

Published : Dec 4, 2020, 9:08 PM IST

अहमदनगर- नगर शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आणि यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार नामांकित वृत्तपत्राचे संपादक बाळ बोठे यांना अटक करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना एक निवेदनही दिले आहे.

मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा -

वृत्तपत्र वितरण ते संपादक या पदावर पोहचलेले बोठे हे अनेक हॉस्पिटलमध्ये संचालक आहे. तसेच शासनाच्या अनेक समितीवर सदस्यही आहेत. वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी लेखमालिका चालवून हस्तकांमार्फत अनेकांना ब्लॅकमेलिंग केले आहे. या परिस्थितीत आज कोट्यवधींची माया जमवलेल्या बोठे यांच्या संपत्तीची चौकशी होणे गरजेचे असल्याचे खेडेकर यांनी म्हटले आहे. तसेच प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास मनसे तीव्र आंदोलन करेल, असा इशारा दिला आहे.

बोठे पोलिसांना सापडेना -

रेखा जरे यांचा 30 नोव्हेंबर रोजी पुणे-नगर रोडवरील जातेगाव घाटात गळा चिरून निर्घृण खून झाला होता. पोलिसांनी तातडीने तपास करत सुरवातीला 1 डिसेंबर रोजी तीन आरोपींना तर दोन डिसेंबर रोजी दोन आरोपींना अटक केली होती. या दरम्यान मास्टरमाइंड असलेले बाळ बोठे या प्रकरणी संशयित असल्याची चर्चा जिल्हाभर होती. मात्र, हल्लेखोरांना अटक झाली, तरी मास्टरमाइंड बाबत पोलीस अधिकृत काही सांगत नव्हते. पोलिसांनी 2 डिसेंबर रोजी सायंकाळी बोठे यांच्या घराची झडती घेतली आणि काही पुरावे ताब्यात घेतले. मात्र, तो पर्यंत बोठे हे अगोदरच फरार झाले होते. आता पोलिसांची विविध पथके त्यांचा राज्यभर शोध घेत आहेत. मात्र, अजून ते पोलिसांना सापडलेले नाही. बोठे हे एका नामांकित राज्यस्तरीय वृत्तपत्राचे अहमदनगर आवृत्तीचे संपादक असल्याने त्यांना ताब्यात घेण्यास उशीर होत आहे का, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.

क्राईम रिपोर्टर ते मर्डर मास्टरमाइंड असा बोठेंचा प्रवास-

जिल्ह्यातील वाळकी या छोट्या गावातून शिकून आलेले बाळ जगन्नाथ बोठे हे सुरवातीला वृत्तपत्र विक्रेता आणि वितरणाचे काम करत होते. पुढे छोट्या-मोठ्या दैनिकात काम करत एका नामांकित वृत्तपत्रात ते पुढे क्राईम रिपोर्टर झाले तसेच पुढे जिल्हा आवृत्तीचे संपादकही झाले. विविध विषयांवर लेखमाला तसेच पुस्तके लिहीत लेखक म्हणूनही प्रसिद्धी मिळवली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते विशेष कार्यक्रम घेत त्यांचा गौरव झाला होता. पुणे विद्यापीठ आणि शासकीय समित्या आणि मंडळावर सदस्य म्हणून पण त्यांची नियुक्ती आहे. शहरातील काही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ते संचालक असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे बोठेंसारखे कथित प्रस्थ एका सामाजिक कार्यकर्तीच्या खून प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून पुढे येणे धक्कादायक मानले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने बोठेंचा शोध लावून त्यांना अटक करावी आणि हत्येचे कारण जनतेसमोर यावे, यासाठी पोलीस प्रशासनावर मोठा दबाव आहे. बोठेच्या शोधासाठी पाच पथके प्रयत्न करत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.