ETV Bharat / state

समर्थकांनी मोर्चे-आंदोलने करू नयेत; मी कायदेशीर मार्गानेच लढणार - इंदूरीकर महाराज - इंदुरीकर महाराज यांच्या समार्थकांबद्दल बातमी

प्रसिध्द कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी त्यांच्या समर्थकांना निवेदन काढून मोर्चा अथवा आदोलन न करण्याची विनंती केली आहे. या प्रकरणी काही गावानी आदोनाचा पवित्रा घेतला असून समाज माध्यमातून 'सपोर्ट इंदुरीकर महाराज' हा हॅश टॅग वापरला जात आहे.

indurikar-maharaj-has-appealed-to-supporters-not-to-do-marches-or-agitations
समर्थकांनी मोर्चे-आंदोलने करू नयेत; मी कायदेशीर मार्गानेच लढणार - इंदूरीकर महाराज
author img

By

Published : Feb 17, 2020, 12:38 PM IST

अहमदनगर - प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी सम-विषम तारखेचा दाखला देत मुलगा किंवा मुलगी होते, या आशयाचे वक्तव्य केले होते. या नंतर त्यांना पीसीपीएनडीटी कायद्यान्वये त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या पाश्वभूमीवर एकीकडे इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखळ करा अशी मागमई सामाजिक संघटना, भुमाता ब्रिगेड, अंधक्षद्धा निर्मूलन समिती आदींनी केलेली आहे. दुसरीकडे इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल होणार असेल तर आंदोलन करू, रस्त्यावर उतरून या पद्धतीचे इशारे देण्यात येत आहेत. या पाश्वभूमीवर इंदूरीकर महाराजांनी एक निवेदन जारी करुन आपण कायदेशीर लढाई लढणार आहे. माझ्या समर्थनार्थ मोर्चा आंदोलने करूनयेत असे आवाहन केले आहे.

indurikar-maharaj-has-appealed-to-supporters-not-to-do-marches-or-agitations
समर्थकांनी मोर्चे-आंदोलने करू नयेत; मी कायदेशीर मार्गानेच लढणार - इंदूरीकर महाराज

या प्रकरणी काही गावानी आंदोनाचा पवित्रा घेतला आहे. समाज माध्यमातून अनेकांनी 'सपोर्ट इंदुरीकर महाराज' हा हॅश टॅग वापरून महाराजंना मोठ्या संख्येने समर्थन देण्यात येत आहे. या पाश्वरभूमीवर कायदा सुव्यावस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि समाजामध्ये चूकीचा संदेश जाऊ नये या अनुषंगाने इंदुरीकर महाराजांच्या वतीने निवेदन जारी केले आहे. या मध्ये त्यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांबाबत कायदेशीर लढाई लढणार असून माझ्या समर्थनार्थ कोणीही मोर्चे आंदोलने करू नयेत असे आवाहन केले आहे.

आज याबाबत एक प्रसिद्धीपत्रक समाज माध्यमात फिरत असून या प्रसिद्धी पत्रकावर असलेला महाराजांचा नंबर मात्र नॉट रिचेबल येत आहे. मात्र, एकूणच कुठेतरी या प्रकरणावर महाराजांनी कायदेशीर मार्गाने या गोष्टीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. सोमवारीअंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अहमदनगर जिल्हा रुग्णालयात पीसीपीएनडीटी समितीचे प्रमुख जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरंबीकर यांची भेट घेऊन इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.