ETV Bharat / state

'तो मी नव्हेच', इंदोरीकर महाराजांचा पीसीपीएनडिटी समितीसमोर खुलासा - Indorikar Maharaj

'ते' वादग्रस्त वाक्य मी बोललोच नाही. मी असे कीर्तन केलेले नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात, मी नगर जिल्ह्यात कीर्तन केलेले नाही, असे स्पष्टीकरण इंदोरीकर यांनी दिले आहे.

Indorikar Maharaj
इंदोरीकर महाराज
author img

By

Published : Feb 20, 2020, 8:51 PM IST

अहमदनगर - पुत्रप्राप्तीसाठी सम-विषम तिथीचा फॉर्म्युला दिल्यानंतर कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर अडचणीत आले आहेत. यानंतर अनेकांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावर इंदोरीकर यांनी बुधवारी प्रसुतीपुर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध (पीसीपीएनडिटी) सल्लागार समितीसमोर खुलासा सादर केला आहे.

इंदोरीकर महाराजांचा पीसीपीएनडिटी समितीसमोर खुलासा

हा खुलाशाचा मजकूर समितीचे प्रमुख तथा अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप मुरंबीकर यांनी गुरूवारी माध्यमांसमोर जाहीर केला. यावेळी त्यांनी आपल्या लेखी खुलाशात 'ते' वादग्रस्त वाक्य मी बोललोच नाही. मी असे कीर्तन केलेले नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात, मी नगर जिल्ह्यात कीर्तन केलेले नाही, 'तो मी नव्हेच', असे म्हणण्यासारखा प्रकार समोर आला आहे.

कीर्तनातून मी समाजप्रबोधन करत असतो, त्यासाठी मला महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी पुरस्कार मिळाला आहे. तसेच इतर ठिकाणाहून देखील पुरस्कार मिळालेले आहेत. युट्युबवर देखील आम्ही काही टाकत नाही. कोणत्याही कीर्तनाचे रेकॉर्डिंग करत नाही, असेही इंदोरीकर यांनी लेखी खुलाशात सांगितले आहे.

इंदोरीकर यांनी जी उत्तरे दिली आहेत, ती समाधानकारक आहेत. मात्र, ज्या वर्तमानपत्रात हे वक्तव्य छापून आले आहे. त्यांनी मात्र समितीसमोर आपली बाजू अजून मांडली नाही. त्यामुळे जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत पुढे जाता येणार नाही, असे पीसीपीएनडिटी समिती प्रमुख मुरंबीकर यांनी स्पष्ट केले आहे. एकंदरीत आता ज्या वृत्तपत्राने कोणत्या यूट्यूब चॅनेलच्या आधारे वादग्रस्त वक्तव्याबाबत बातमी प्रसिद्ध केली आहे, त्यांच्याकडील पुराव्यासह उत्तरावर सल्लागार समिती पुढील कारवाई करणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.