ETV Bharat / state

थोरात कारखान्याची वाटचाल गैरवास्पद - बाळासाहेब थोरात - Balasaheb Thorat Latest News

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी कारखान्यातून दारू निर्मिती न करण्याचा निर्णय घेतला. ही परंपरा व आदर्श तत्वे जपत साखर कारखाना व अमृत उद्योग समूहाने देशात लौकीक प्राप्त केला आहे. असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. ते कारखान्याच्या 40 हजार लिटर क्षमतेच्या नवीन इथेनॉल प्रकल्प, सी.पी.यु युनिट व लिप्टच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.

इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन
इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन
author img

By

Published : Mar 14, 2021, 7:45 PM IST

अहमदनगर - सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी कारखान्यातून दारू निर्मिती न करण्याचा निर्णय घेतला. ही परंपरा व आदर्श तत्वे जपत साखर कारखाना व अमृत उद्योग समूहाने देशात लौकीक प्राप्त केला आहे. आर्थिक शिस्त, काटकसर, पारदर्शकता या तत्वांवर मार्गक्रमण करत थोरात कारखान्याची वाटचाल गौरवास्पद सुरू असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. ते कारखान्याच्या 40 हजार लिटर क्षमतेच्या नवीन इथेनॉल प्रकल्प, सी.पी.यु युनिट व लिप्टच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.

थोरात कारखान्याची वाटचाल गैरवास्पद

कारखान्याची गैरवास्पद वाटचाल

दरम्यान पुढे बोलताना थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्श तत्त्वांवर कारखान्याची वाटचाल सुरू आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करत हा तालुका प्रगतीपथावर पोहोचला आहे. कारखान्याने नव्याने पाच हजार पाचशे मेट्रिक टन क्षमतेसह 30 मेगावॅट वीज निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला असून, हा प्रकल्प सर्वांसाठी दिशादर्शक ठरत आहे. याच बरोबर डिस्टलरी प्रकल्पाचे नूतनीकरण करताना चाळीस हजार लिटर क्षमतेच्या नवीन इथेनॉल प्रकल्पाचा शुभारंभही आज करण्यात आला आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दारु न बनविता इंडस्ट्रीयल अल्कोहोल बनविण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी कारखान्याचे सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वास संपादन केला. आजही कारखाना त्यांच्याच तत्वावर सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.