ETV Bharat / state

शिक्षकांसदर्भातील 'ते' वक्तव्य मी कधीच केले नाही, मला शिक्षकांबद्दल आदरच - अण्णा हजारे - अण्णा हजारेंचे शिक्षकांसदर्भात व्यक्तव्य

जे वक्तव्य केलेलेच नाही, असे वक्तव्य आपल्या तोंडी घालून समाजात विशेषतः शिक्षक वर्गात गैरसमज आणि असंतोष निर्माण करण्याचा उद्योग या संपादकाने केला असून त्याबद्दल आपण त्या वृत्तपत्राला कायदेशीर कारवाईची नोटीस पाठवणार असल्याचे अण्णा हजारे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

anna hajare latest news
anna hajare latest news
author img

By

Published : Sep 1, 2021, 1:38 AM IST

Updated : Sep 1, 2021, 12:10 PM IST

अहमदनगर - औरंगाबाद येथून प्रसिद्ध होणाऱ्या एका वृत्त पत्राच्या संपादकावर समाजसेवक अण्णा हजारे चांगलेच नाराज झाले आहेत. जे वक्तव्य केलेलेच नाही, असे वक्तव्य आपल्या तोंडी मारून समाजात विशेषतः शिक्षक वर्गात गैरसमज आणि असंतोष निर्माण करण्याचा उद्योग या संपादकाने केला असून त्याबद्दल आपण त्या वृत्तपत्राला कायदेशीर कारवाईची नोटीस पाठवणार असल्याचे अण्णांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. तसेच यापूर्वीही या वृत्तपत्राने खोटे आणि बदनामीकारक वृत्त दिले होते. मात्र, त्यावेळी त्यांनी जाहीर माफी मागितल्याने आपण दुर्लक्ष केले. पण यावेळी आपल्याबाबत खोटे वृत्त प्रसिद्ध केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करणार असल्याचे अण्णांनी सांगितले आहे.

शिक्षकांसदर्भातील 'ते' वक्तव्य मी कधीच केले नाही, मला शिक्षकांबद्दल आदरच

तक्रारीत अण्णांनी काय म्हटले? -

औरंगाबाद येथील एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले शिक्षकांसदर्भातील विधान मी केलेले नाही. ते माझ्या तोंडी घालून समाजात द्वेष भावना निर्माण करण्यासाठी अशी खोटी बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे वाटते. यापूर्वीही अनेकदा या वृत्तपत्रात माझ्याबद्दल आणि जनआंदोलनाबद्दल चुकीच्या व खोट्या बातम्या प्रसारीत करण्यात आल्या आहेत, असे निदर्शनास आले आहे.

समाजात शिक्षकाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. देशाचे भवितव्य असलेली नवीन पिढी घडविण्याचे काम शिक्षकच करीत असतात. त्यामुळे समाजात शिक्षकांविषयी आदराची भावना आहे. मीही शिक्षकांविषयी नेहमीच आदर व्यक्त केलेला आहे. परंतु काल या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे मला खेद वाटला. तसेच संपूर्ण शिक्षक वर्गात संभ्रम निर्माण झाल्याचे सोशल मिडियावर दिसून आले. ही बाब समाजाच्या दृष्टीने चांगली नाही. मी नेहमी सांगत असतो की, दिवसेंदिवस वाढती द्वेषभावना ही समाज व देशासाठी घातक आहे. काही अविचारी लोक समाजात दुही, द्वेषभावना आणि तेढ निर्माण होईल, असा प्रयत्न सातत्याने करीत असतात. त्यामुळे समाजाचे मोठे नुकसान होत असते.

वास्तविक, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला गेलेला आहे. त्यामुळे पत्रकारांनी व माध्यमांनी अत्यंत जबाबदारीने वागले पाहिजे. पण या क्षेत्रातही काही अपप्रवृत्ती असल्याचे या बातमीवरून दिसून येते. त्यातूनच अशा खोट्या बातम्या पसरवल्या जातात. समाजाने जागरुक राहून अशा प्रवृत्तींना थारा देऊ नये. समाजातील वातावरण सौहार्दपूर्ण राहील असा विचार करावा. शिक्षकी पेशा हा एक पवित्र पेशा आहे. शिक्षकांनी अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये. तसेच गैरसमज करून न घेता आपले ज्ञानदानाचे पवित्र काम सुरू ठेवावे, असे अण्णांनी तक्रारीत म्हटले आहे.

संपादकाला कायदेशीर नोटीस देणार -

एका वृत्तपत्राने अण्णांच्या नावाने खोटे आणि समाजात गैरसमज परवणारे वृत्त दिले आहे. याबाद्दल त्यांना कायदेशीर नोटीस देत असल्याचे तसेच पारनेर पोलीस ठाण्यात यासंदर्भाथ गुन्हा दाखल करणार असल्याचे अण्णा हजारे यांचे कायदेशीर काम पाहणारे अॅड. शाम असावा यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - corona update - राज्यात आज ४१९६ कोरोनाचे नवे रुग्ण, १०४ जणांचा मृत्यू

Last Updated : Sep 1, 2021, 12:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.