अहमदनगर ( शिर्डी ): हैद्राबाद येथील या सर्व साईभक्तांचे साईबाबा मंदिराचा वर्धापन दिनानिमित्त कुंभारी गावात आगमन झाले. प्रथम एका छोटेखानी कार्यक्रमात कुंभारी ग्रामस्थांचे वतीने पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. लेझीम फटाक्यांची आतिषबाजी तसेच डि जेच्या तालावर वाजत गाजत मोठ्या थाटामाटात संपूर्ण गावात पाहुण्यांची मिरवणुक काढुन जंगी स्वागत करण्यात आले.
भव्यदिव्य कार्यक्रम: गावात जागोजागी पाहुण्यावर पुष्पसुमनांची वर्षाव करून स्वागतासाठी सुवासिनींनी अंगणात सडा टाकुन रस्ताच्या दोन्ही बाजुला रांगोळी काढली. घरासमोर मिरवणुक येताच सुवासिनींनी पाहुण्यांचे आरती ओवाळुन औक्षण केले. ग्रामस्थ यांच्याबरोबर पाहुण्यांनाही गाण्याच्या तालावर ठेका धरण्याचा मोह आवरला नाही. त्यानंतर राघवेश्वर मंदीरात भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्रथम उपस्थित साधुसंतांचे पूजन तसेच पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. गुरूवर्य शिवानंद गिरीजी महाराज व महंत राघवेश्वरानंद गिरीजी महाराज यांचे प्रवचन झाले. यावेळी किर्ती गोपीकृष्णन यांनी कुंभारी वासियांनी केलेल्या पाहुणचाराने व स्वागताने भारावुन गेले. साईबाबांनी सेवा करण्याची संधी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
सोन्याची आरती : या आधीही 11 जानेवारी रोजी चेन्नई येथील साईभक्त व्ही जितेंद्र यांनी सोन्याची आरती देणगी स्वरूपात साईबाबा संस्थानला दिली होती. साईबाबांनी दिलेले बाबांना परत देत असल्याचे भाविकाचे म्हटले होते. दरम्यान साईबाबा संस्थानला सोन्याची आरती देणाऱ्या व्ही जितेंद्र यांचा शॉल साई मूर्ती देवुन सन्मान करण्यात आला होता.
एक कोटी रुपयांची देणगी: 2023 या नवीन वर्षाच्या सुरुवातीला साईबाबांना मोठे दान आले होते. हैदराबाद येथील साईभक्त राजेश्वर यांनी साईबाबांना तब्बल एक कोटी रुपयांची देणगी दिली होती. तर दुसरीकडे चेन्नई येथील साईभक्त व्ही जितेंद्र यांनी तब्बल 27 लाख 77 हजार 664 रुपय किमतीची सोन्याची आरती देणगी स्वरूपात साईबाबांना दिली होते. चेन्नई येथील एका साई भक्त परिवाराने साईबाबांच्या चरणी तब्बल 544 ग्रॅम वजनाची आरती दान स्वरूपात दिली होती. या सोन्याच्या आरतीची किंमत 27 लाख 77 हजार 664 रुपये असल्याची माहिती साई संस्थांच्या वतीने देण्यात आली होती.
इतकी रक्कम जमा: २६ डिसेंबरपर्यंत दक्षिणा पेटीत १६५ कोटी ५५ लाख, देणगी जमा झाली आहे. तसेच, काउंटरवर ७२ कोटी २६ लाख जमा झाली. डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे ४० कोटी ७४ लाख जमा झालेली आहे. तर ऑनलाइन देणगीतून ८१ कोटी ७९ चेक व डीडीद्वारे १८ कोटी ६५ लाख रुपये जमा झाले आहेत.