ETV Bharat / state

Husband Murder Case : पत्नीनेच केला पतीचा खून अन् रचला दरोड्याचा बनाव; पोलिसांनी उलगडले धक्कादायक गुपित

Husband Murder Case : अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर येथे काल दरोडा टाकत विवाहित तरुणाला गळफास देत जीवे मारण्यात आले होते. नईम रशिद पठाण (Wife killed husband) असे मृताचे नाव होते. घटनेत मृताची पत्नी बुशरा पठाण ही जखमी झाल्याचे आढळून आले होते. याप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास केला असता पत्नीने दरोड्याचा बनाव रचून पतीची हत्या केल्याचे चौकशीत समोर आले. आपला पती आपल्याला सात वर्षांपासून नेहमी 'लैंगिक त्रास' देत होता. याच रागातून तिने पती नईम पठाण याची हत्या केल्याची कबुली दिली. (Naeem Pathan Massacre Belapur)

Husband Murder Case
नईम पठाण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 22, 2023, 9:28 PM IST

बेलापूर दरोडा आणि हत्या प्रकरणी बोलताना महिला पोलीस अधिकारी

अहमदनगर Husband Murder Case : जिल्ह्यातील बेलापूर येथे काल दरोडा टाकत विवाहित तरुणाला गळफास देत जीवे मारण्यात आले होते. पोलीस तपासातून पत्नीनेच दरोड्याचा बनाव करत पतीचा खून केल्याची (Wife killed husband) धक्कादायक घटना समोर आली आहे. दरोड्याचा बनाव करून पतीचा गळा आवळून खून करणारी आरोपी बुशरा पठाण हिला स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर आणि श्रीरामपूर शहर पोलिसांनी सखोल तपास करून तातडीने अटक केली. त्यामुळे काही तासातच हा दरोड्याचा बनाव असल्याचे पोलिसांनी उघड केले आहे. (Naeem Pathan Massacre Belapur)

हत्येची पद्धत पाहून पोलिसही चक्रावले : अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर जवळील एकलहरे येथे बुधवारी रात्री नईम रशिद पठाण याच्या घरी दरोडेखोरांनी सात लाख रुपये रोख रक्कम व काही दागिने चोरत घर मालक नईम पठाण यांची साडीच्या साहय्याने गळफास लावून हत्या केली. त्यानंतर दरोडेखोरांनी पत्नीला गंभीर जखमी केल्याचे समोर आले होते. दरोडा टाकत गळफास देत जीवे मारण्याची दरोडेखोरांची ही गुन्हा करण्याची नवीन पध्दत पोलिसांसह अनेकांना चक्रावून टाकणारी होती.

गुन्ह्याची उकल करण्यात यश : या गुन्ह्याचा पोलिसांनी तपास सुरू करताच काही तासातच पोलिसांना ह्या गुन्ह्याची उकल करण्यात यश आले. दरोड्यात मयत झालेला नईम रशिद पठाण याची जखमी पत्नी हिचे जाब जबाब घेतले असता त्यात तफावत आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच नईमची पत्नी बुशरा हिनेच पती नईम रशिद पठाण याची हत्या केल्याचे सांगितले. आपला पती आपल्याला सात वर्षांपासून नेहमी 'सेक्स्युअली टॉर्चर' करत होता. याच रागातून तिने पती नईम पठाण याची हत्या केल्याची कबुली दिली.

वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल : अनिस जहागीरदार यांनी तातडीनं ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे संदेश देऊन सगळ्यांना जागृत केलं. याबाबत बेलापूर पोलिसांना माहिती समजताच त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, उपनिरीक्षक सुरेखा देवरे अशा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. अहमदनगर गुन्हे अन्वेषण विभागाचं पथकही गावात दाखल झालं. तसंच ठसे तज्ञ, श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं होतं.

श्वान पथक बंगल्याभोवतीच घुटमळले : बेलापूर उक्कलगाव रस्त्यावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे आरोपी लवकर हाती लागण्याची दाट शक्यता होती. घटनेच्या कालावधीत एक स्विफ्ट कार या रस्त्यानं गेल्याचं आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. अहमदनगर गुन्हे अन्वेषण विभागाचं पथक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, बेलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस या घटनेचा तपास करत होते. दरोडेखोरांनी नईम पठाण यांचा गळा आवळून खून केल्यामुळे पोलीसही चक्रावून गेले होते. घटनास्थळी दाखल झालेलं श्वान पथक बंगल्याभोवती घुटमळल्यानं उलटसुलट चर्चा सुरू होती. आता या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

हेही वाचा:

  1. Cyber Crime Pune : पुण्यात सायबर गुन्ह्यात वाढ, 8 महिन्यात विविध गुन्ह्यांमध्ये कोट्यवधींचा गंडा
  2. Satara Murder News: लग्न करण्यासाठी प्रियकरानं मित्राच्या मदतीनं केलीय प्रेयसीच्या पतीची हत्या; दोघांना अटक, एक फरार
  3. Thane Murder News : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या प्रकरण; प्रियकराला पश्चिम बंगालमधून अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.