अहमदनगर (शिर्डी): साई मंदिराचे चारही दर्शन प्रतिक्षा हॉल भरगच्च भरून गेल्याने भाविकांची दर्शन रांग रस्त्यावरील मंडपात पोहोचली आहे. जवळपास दिड लाखापेक्षा अधिक भाविक शिर्डीत आज दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवार, रविवार आणि स्वातंत्र्यदिनाच्या अशा चार दिवसांच्या सुट्या जोडून आल्याने आज देश भरातून लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत. या सुट्यांमध्ये शिर्डीला येणाऱ्या भक्तांचा ओघ लक्षात घेता साईबाबा संस्थानच्या वतीने दर्शनाची तसेच निवासाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच बरोबर भक्तांच्या सुरक्षेचीही काळजी घेतली जात आहे.
पाणी आणि भोजनाची व्यवस्था: शिर्डीत होत असलेली भविकांची गर्दी लक्षात घेता साई संस्थानच्या वतीने ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच साई संस्थानच्या प्रसादालयात भोजन व्यवस्था देखील साई संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. आज भाविकांनी साई समाधीच्या दर्शनासाठी किमान दोन ते तीन तास लागत असल्याने भाविकांना किमान एक ते दोन तासात साई समाधीचे दर्शन मिळावे, यासाठी साई संस्थानकडून प्रयत्न केला जात आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये भाविकांची गर्दी: साई मंदिरात दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही मोठी गर्दी उसळत असते. मागील वर्षीच्या दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे साईबाबांच्या शिर्डीत भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी दोन लाखांहून अधिक भाविक साई नगरीत दाखल झाले होते. भक्तांच्या गर्दीने साईमंदिराकडे जाणारे सर्व रस्ते फुलून गेले होते. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दर्शनासाठी किमान दोन ते तीन तास रांगेत उभे रहावे लागत होते.

कोरोना काळात रात्रीची संचारबंदी: दरवर्षी 31 डिसेंबरला शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे साईबाबा संस्थानकडून रात्रभर साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात येते. मात्र, कोरोना काळात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी मंदिर रात्री बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे 1 जानेवारीला सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
हेही वाचा: