अहमदनगर : हिरवाईने नटलेला परिसर आणि सह्याद्रीच्या पर्वत रांगा अश्या निसर्गरम्य परिसरात नवरात्र उत्सवाच्या ( Navratri 2022 ) काळात कळसुदेवीच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी दिसून येत ( Devotees crowd for Kalsudevi darshan ) आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळसुबाई डोंगरावर नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला ( Navratri festival celebrated on Kalsubai top ) जातोय.
सर्वात उंच शिखर : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून कळसूबाईच्या शिखराची नोंद आहे. शिखराच्या पायथ्याशी असलेल्या बारी या छोट्याश्या गावातून या डोंगराच्या चढाईस सुरवात होते.समुद्र सपाटी पासून ५४०० फूट उंचीवर असलेल्या कळसूबाईच्या दर्शनाची ओढ भाविकांना लागली आहे. डोंगरकपारीतून ओबड धोबड रस्त्यावरून पाऊलवाट काढत जीव मुठीत धरत प्रवास करून भाविक आपल्या कळसुबाईचे दर्शन करत आहे. मुली आणि महिलांची संख्या लक्षणीय असली तरी तरुणांबरोबर वृध्दांची हि संख्या कमी नाही. साधारणता निम्यापर्यंत पाऊलवाटेने गेल्यानंतर लोखंडी शिड्या चढून भाविक कळसूबाईच्या मंदिराकडे मार्गक्रमण करत असून आपला थकवा घालविण्यासाठी भाविकांकढून कळसूबाईच्या नावाचा जयघोष सुरु असतो. रसत्यात मध्येच पाऊस लागला तरी न डगमगता हे भाविक आपली चढन सुरुच ठेवतात.
मातेची अख्याईका : बारी गावातील शिंदे कुटूंबियांनी इंदोरी गावातील खाडे यांची कन्या कळसू हिला दत्तक म्हणून घेतले होते. मात्र दत्तक जाताना कळसूने एक आट घातली होती. कि मी कुठल्याही प्रकारची धुणीभांडी. झाडलोट करणार नाही. आणि कोणाच्याही चपला उचलणार नाही परंतु या गोष्टीचा खाडे कुटूंबियांना विसर पडला आणि एका दिवशी त्यांनी कळसूला घरी आलेल्या पाहुण्याची उष्टी भांडी उचलण्यास सांगितल्याने कळसू क्रोधीत झाली. गावाच्यावर असलेल्या उंच शिखरावर जावून बसली. कळसूला विनवणी करूनही ती खाली आली नाही. अखेर कळसूने शिखरावर एका शिलेचे रूप धारण केले. त्यानंतर हे स्थान कळसूबाईचे स्थान म्हणून नावाने प्रचिलित झाले आहे. हजारो वर्षापासून या ठिकाणी भाविक मातेची विनवणी करत असल्याची अख्याईका सांगितली जाते.
आदिवासी सामाज्याची दैवत : कळसुबाई हि प्रमुख्याने आदिवासी सामाज्याची दैवत या समाज्याच्या बरोबरीने इतरही समाज्यातील लोक पुत्रप्राप्त आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रतिवर्षी या डोंगराची कठीण चढाई करत कळसुबाई शिखरावर येत ( Devotee climb up a mountain to fulfill a wish ) असतात. नवरात्रात तर नऊ दिवस या अतीउंच शिखरी आईचा जोगव्याचा गजर होत असतो. आपली मनोकामना पूर्णव्हावी यासाठी आईला नेवैद् चोळी, बांगडी भाविक मोठ्या भक्तीभावाने अर्पण करतात.