ETV Bharat / state

Holi celebrated Sai Baba temple : साईबाबांच्या मंदिरात 'अशा' पद्धतीने साजरी झाली होळी - होळी साजरा साई मंदिर शिर्डी

आज शिर्डी साईबाबांच्या गुरुस्थान मंदिरासमोर पारंपारिक पद्धतीने होळीचे पूजन ( Holi celebrated Sai Baba temple ) करून होळीचे दहन करण्यात आले. तसेच, पालथ्या हाताने शंखध्वनी अर्थात बोंब मारत मनातील अनिष्ठ प्रवृत्ती शांत होवो अशीच प्रार्थना साईबाबा संस्थान आणि भक्तांनी साईबाबांच्या चरणी केली.

Holi celebrated shirdi sai baba
होळी साई मंदिर शिर्डी
author img

By

Published : Mar 17, 2022, 4:06 PM IST

अहमदनगर - आज शिर्डी साईबाबांच्या गुरुस्थान मंदिरासमोर पारंपारिक पद्धतीने होळीचे पूजन ( Holi celebrated Sai Baba temple ) करून होळीचे दहन करण्यात आले. तसेच, पालथ्या हाताने शंखध्वनी अर्थात बोंब मारत मनातील अनिष्ठ प्रवृत्ती शांत होवो अशीच प्रार्थना साईबाबा संस्थान आणि भक्तांनी साईबाबांच्या चरणी केली.

हेही वाचा - Balasaheb Thorat Homage Shankarrao Kolhe : 'राज्याच्या राजकारणासह सहकार क्षेत्रातील अनुभवी नेतृत्व हरपले'

होळीचा सण हा आज संपूर्ण भारतभर साजरा केला जात आहे. होळी साजरी करण्याची परंपरा पूर्वकाळापासून चालत आली आहे. शिर्डीतही साईबाबांच्या काळापासून होळी पुजन करून दहन केले जाते. आज साई मंदिराजवळ गुरुस्थान समोर एरंड, फुलांचीमाळ, ऊस आणि पाच गौऱ्या मधात उभे करून होळीला तयार करण्यात आले व मध्यान्ह आरतीच्या आधी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते पुजन करून दहन केले गेले.

मनातील दृष्ट प्रवृत्ती नष्ट होण्यासाठी उत्सव साजरा

मनातील दृष्ट प्रवृत्ती नष्ट होण्यासाठी आज आणि उद्याचा उत्सव साजरा केला जात आहे. आज साईबाबांच्या मूर्तीला साखरीपासून तयार केलली गाठी घालण्यात आली आहे व देशावरील कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी भाविकांनी यानिमिताने साईबाबांना प्रार्थना केली. साईच्या शिर्डीतही सौख्य लाभावेत आणि अनिष्ठ प्रवृत्ती लोप पाव्यात यासाठी होळीचे पूजन केले गेले.

होलिका दहनानंतर दुपारची मध्यान्ह आरती पार पडली. यावेळी साईबाबांच्या मूर्तीला साखरेने बनवलेले गाठीकड्यांची माळ घालण्यात आली होती. आज होळी नंतर 5 दिवसांनी साईबाबांच्या शिर्डीत रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात येते. या रंगपंचमीसाठी देशभरातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात आणि साईंच्या शिर्डीत रंगपंचमी साजरी करतात.

हेही वाचा - Shankarrao Kolhe Pass Away : सहकाररत्न माजी मंत्री शंकरराव कोल्हे कालवश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.