ETV Bharat / state

Hindu Muslim Unity In Shridi : 'सबका मलिक एक'चा मंत्र देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत दिसला हिंदू मुस्लीमचा एकतेचा नजारा

आज रामनवमी ( Ramnavmi ) निमित्त 'रामजी की निकली सवारी, रामजी की लिला है न्यारी' अशा सुरात ( Shirdi Saibaba Rally ) आज सायंकाळी प्रभू रामचंद्राची प्रतिमा सोन्याच्या रथात विधीवत पुजन करून ठेवण्यात आली. त्यासोबत साईबाबांची प्रतिमा, बाबांच्या चरण पादुका आणि सटका ठेवून सुवर्ण रथात मिरवणूक शिर्डी शहरातून काढण्यात आली.

Hindu Muslim Unity In Shridi
Hindu Muslim Unity In Shridi
author img

By

Published : Apr 10, 2022, 9:21 PM IST

अहमदनगर - आज रामनवमी ( Ramnavmi ) निमित्त 'रामजी की निकली सवारी, रामजी की लिला है न्यारी' अशा सुरात ( Shirdi Saibaba Rally ) आज सायंकाळी प्रभू रामचंद्राची प्रतिमा सोन्याच्या रथात विधीवत पुजन करून ठेवण्यात आली. त्यासोबत साईबाबांची प्रतिमा, बाबांच्या चरण पादुका आणि सटका ठेवून सुवर्ण रथात मिरवणूक शिर्डी शहरातून काढण्यात आली. रथासमोर ढोल ताशांचा निनाद आणि मागे प्रभू रामचंद्राचा रथ इस विलोभनीय दृष्य पाहण्यासाठी भाविकांची एकच गर्दी उसळली. रथात विराजमान प्रभू रामचंद्राच दर्शन घेऊन भाविक नतमस्तक होत होते.

प्रतिक्रिया

सुवर्ण रथातून साईंची मिरवणूक - रामनवमी निमित्ताने आज सायंकाळी 5 वाजता साई मंदिरापासून प्रभू रामचंद्राची शोभा मिरवणूक निघाली. द्वारकामाईत विधीवत पुजन होऊन प्रभू रामचंद्राची प्रतिमा, साईंची प्रतिमा, चरण पादुका आणि सटक्याची सुवर्णरथातून शिर्डीतून मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या निनादात दोन तास ही शोभा मिरवणुक सुरू होती. भाविक ही दर्शनासाठी गर्दी करत होते. सात वाजता रथाची मिरवणूक साई समाधी मंदिरात पोहचल्यानंतर साईंची धुपारती पार पडली.

मिरवणूक हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक - दरम्यान, हिंदू मुस्लीम एकतेच प्रतिक असलेल्या भगव्या आणि हिरवा झेंडा असलेली काठ्यांची निशान मिरवणूकही मोठ्या दिमाखात निघाली. हिंदू मुस्लीम अशा सर्वच धर्माचे भाविक यात सहभागी झाले होते. हे निशान जणू सर्वधर्म समभावाची शिकवण देत होते. शिर्डीतील हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी सातत्याने वाढतच होती. आज रामनवमी उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने जास्तीत जास्त भाविकांना दर्शन घेता यावे, यासाठी साई समाधी मंदिर रात्रभर उघड ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा - Silver Oak Attack Case : शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणी गुप्तचर विभागाने तीन महिने आधीच दिला होता इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.