ETV Bharat / state

भेंडा परिसरातल्या ऊस बेण्याला मोठी मागणी, रोज सुमारे ४०० टन ऊस विक्री - usachya benyachi magni

नेवासा तालुक्यातील भेंडा, देवगाव, देडगाव परिसरातील ऊस बेण्याला बीड-गेवराई मधील शेतकऱ्यांची मोठी मागणी आहे. भेंडा परिसरातील अखिलेश वे-ब्रिज येथून दररोज सुमारे 400 टन ऊसाची बेण्यासाठी विक्री होत आहे.

भेंडा परिसरातील ऊस बेण्याला बीड-गेवराईतुन मोठी मागणी

author img

By

Published : Jun 14, 2021, 9:51 PM IST

अहमदनगर - नेवासा तालुक्यातील भेंडा, देवगाव, देडगाव परिसरातील ऊस बेण्याला बीड-गेवराई मधील शेतकऱ्यांची मोठी मागणी आहे. भेंडा परिसरातील अखिलेश वे-ब्रिज येथून दररोज सुमारे 400 टन ऊसाची बेण्यासाठी विक्री होत आहे. कायमच दुष्काळी समजल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यात यावेळी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बीडसह गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला पसंती दिली आहे.

उसाच्या बेण्याविषयी माहिती देताना शेतकरी शिवप्रसाद काळे

दर दिवशी 400 टनाहून अधिक ऊसाची विक्री

भेंडा, तेलकुडगाव, दहीगाव, देडगाव, देवगाव ही गावे ऊसाचे आगार म्हणून सर्वांना परिचित आहेत. उत्तम प्रतीचा ऊस उत्पादित करण्यात या गावातील शेतकऱ्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे ऊस लागवड करताना शेतकरी सर्वप्रथम या गावातील ऊसाला प्राधान्य देतात. ऊस लागवडीसाठी बेणे निवडतांना ऊसाचे वय, गुणवत्ता, उगवण क्षमता हे निकष लावले जातात. हे सर्व निकष या गावतील ऊस बेण्यात असते. त्यामुळे ऊस बेणे विक्री-खरेदीकरीता भेंडा परिसरातील अखिलेश वे-ब्रिजवर येतात. दर दिवशी 400 टनाहून अधिक ऊस येथे विक्रीसाठी येतो. ज्यांना बेणे हवे आहे ते शेतकरी याठिकाणी येतात. आपल्या मनपसंतीचे ऊस बेणे निवडून ते विकत घेतात. या ठिकाणाहून सध्या दररोज 400 टनांपर्यंत ऊसाची बेण्यासाठी विक्री होते.

बीड-गेवराई भागातून मागणी

सध्या भेंडा, कुकाणा, तरवडी, तेलकुडगाव, देडगाव, देवगाव, रांजणी या गावातून ऊस विक्री करिता येत आहे. बीड-गेवराई व नेवासा तालुक्यातील काही गावामधे बऱ्यापैकी पाऊस झाल्याने ऊस लागवडीला वेग आलेला आहे. रोग विरहित आणि श्वासवत उत्पन्न देणारे नगदी पीक म्हणून ऊस पीक लागवडी कडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्यामुळेच ऊस लागवडीला वेग आलेला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.