शिर्डी (अहमदनगर) - साईबाबा संस्थान येथील मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत येत आहेत. साईमंदिर भाविकांसाठी खुले झाल्यापासून बगाटे यांच्यासोबत अनेक वादग्रस्त प्रसंग घडले आहेत. आता त्यांच्या साईसंस्थान येथील मुख्य कार्यकारी आधिकारीपदी नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बगाटे यांची साईसंस्थान येथील मुख्यकार्यकारी अधिकारीपदी नेमणूक नियमबाह्य असल्याचे स्पष्ट केले आहे. ही नियुक्ती केल्याबद्दल राज्य सरकारला फटकारत न्यायालयाने सरकारला नोटीस बजावत याबाबत शपथपत्र दाखल करत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.
साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटेंची नेमणूक वादात - शिर्डी मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे न्यूज
न्यायालयाने शिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकारी पदावर आएएस (IAS) अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे आदेश दिले होते. कान्हूराज बगाटे यांची 10 ऑगस्ट 2020 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक झाली. तेव्हा ते आएएस (IAS) अधिकारी नव्हते. मात्र, नंतर त्यांना सरकारने पदोन्नतीतून आएएस पद दिले. त्यामुळे आता राज्य सरकार अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.
![साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटेंची नेमणूक वादात शिर्डी मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे न्यूज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10608214-70-10608214-1613197992312.jpg?imwidth=3840)