ETV Bharat / state

प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करा; पालकमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना - हसन मुश्रीफ अहमदनगर कोरोना प्रतिबंधक उपाययोजना बैठक

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. राज्य शासन आणि प्रशासनाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

Hasan Mushrif
हसन मुश्रीफ
author img

By

Published : Mar 30, 2021, 10:40 AM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा प्रयत्न करत आहे. कोरोनाची तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन आता बाधित रुग्णांना गृह विलगीकरणाऐवजी कोविड केअर सेंटरमध्येच दाखल केले जाणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्हा प्रशासन त्यासंदर्भातील आदेश जारी करतील, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मुश्रीफ यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला

पालकमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक -

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मुश्रीफ यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब भोसले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वीरेंद्र बडदे, अन्न व औषध प्रशासन अधिकारी अशोक राठोड आदी यावेळी उपस्थित होते.

संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नियम पाळा -

सध्या जिल्ह्यासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत नगर शहरात अनेक नागरिक विनामास्क फिरताना दिसत आहेत. संसर्ग वाढवण्यास कारणीभूत ठरणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. महानगरपालिका क्षेत्रात तसेच काही तालुक्यांच्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढीचा वेग जास्त आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी केली जावी, असे निर्देश मुश्रीफ यांनी दिले. गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक जागांवर नागरिक विनामास्क दिसणार नाहीत, यासाठी प्रत्येकाने आग्रही राहिले पाहिजे. नागरिकांनीही स्वत:च्या आणि इतरांच्या आरोग्याचा विचार केला पाहिजे, असे मुश्रीफ यांनी नमूद केले.

पुढील शंभर दिवस महत्त्वाचे -

सध्या जिल्हा प्रशासनाने वाढती कोरोना रूग्णसंख्या आणि संभाव्य वाढ लक्षात घेऊन नियोजन केले आहे. कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात अधिक औषधसाठा उपलब्ध व्हावा, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याशी चर्चा करणार केली जाणार आहे. पुढील १०० दिवस अतिशय महत्त्वाचे असून त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे पालकमंत्री म्हणाले.

लोकप्रतिनिधींनी नागरिकांचे प्रबोधन करावे -

जिल्ह्यात आठवडे बाजारांना बंदी घालण्यात आली आहे. लग्न समारंभासाठी पूर्वपरवानगी आवश्यक करण्यात आली आहे. रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू राहतील. लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी नागरिकांचे प्रबोधन केले पाहिजे. काही खासगी रुग्णालयांकडून वाढील बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याची शहानिशा करून तत्काळ कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

हेही वाचा - नांदेडमध्ये शीख भाविकांच्या हल्ला-महल्ला मिरवणुकीदरम्यान पोलिसांवरच हल्ला; चौघे जखमी

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.