ETV Bharat / state

Gurupurnima festival : साईबाबा संस्थानच्या वतीने उद्यापासून गुरुपौर्णिमा उत्सव - साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी

शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीने यावर्षी रविवार 02 जुलै 2023 ते मंगळवार 04 जुलै 2023 या कालावधीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी साईबाबा संस्थानच्या वतीने गुरूपौर्णिमा उत्‍सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

Gurupurnima festival
Gurupurnima festival
author img

By

Published : Jul 1, 2023, 10:01 PM IST

पी. शिवा शंकर माहिती देतांना

शिर्डी : भारतात गुरुशिष्य परंपरा फार प्राचीन आहे. आषाढी पौर्णिमा ही आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते. साईबाबा हयात असल्यापासून शिर्डीत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यामुळे आजही या दिवसाला अनन्यसाधारण वैश्विक महत्त्व आहे. साईबाबांवर श्रद्धा असलेले भाविक दरवर्षी गुरुपौर्णिमेला शिर्डीला येतात आणि समाधीचे दर्शन घेतात.

असे आहे नियोजन : शिर्डीत यावर्षी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवार 02 जुलै रोजी सकाळी 05.15 श्रीची काकड आरती, 05.45 वाजता श्रींचे फोटो पोथीची मिरवणुक काढण्यात येणार आहे. ६.०० वाजता व्‍दारकामाईत श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण, ६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान, दर्शन, सकाळी 07.00 वाजता श्रींची पाद्यपूजा करण्यात येणार असल्याची माहिती पी. शिवा शंकर यांनी दिली आहे. दुपारी ४.०० ते ६.०० या वेळेत ह.भ.प. डॉ. प्रज्ञा देशपांडे- पळसोदकर,आंबेगाव बु. (पुणे) यांचा कीर्तन कार्यक्रम, सायंकाळी 07.00 वा. श्रींची धुपारती, रात्री 7.30 ते 9.00 आणि रात्री 9.30 ते रात्री 10.00 पर्यंत सुनिता टिकारे, मुंबई यांचा भजन संध्‍याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

कलाकारांचा साईभजन कार्यक्रम : उत्सवाच्या मुख्य दिवशी, सोमवार, 03 जुलै रोजी सकाळी 05.15 वाजता, श्रींची काकड आरती, 05.45 वाजता अखंड पारायण, श्रींच्या फोटोची मिरवणूक, 06.20 ला .श्रींचे मंगलस्नान, दर्शन, सकाळी 7.00 वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी 12.13 वाजता श्रींची माध्यान्ह आरती, सायंकाळी 4.00 ते 6.00 या वेळेत ह.भ.प. डॉ. प्रज्ञा देशपांडे- पळसोदकर, आंबेगाव बु. (पुणे) यांचा कीर्तन कार्यक्रम, सायंकाळी 07.00 वाजता श्रींची धुपारती होईल. विनिता बजाज, दुर्गा साई मंडळ, नवी दिल्ली यांचा भजन संध्याकाळचा कार्यक्रम सायंकाळी 7.30 ते 9.00 आणि रात्री 9.30 ते 10.00, श्रींची रथ मिरवणूक गावातून निघेल. हा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले राहणार आहे. या दिवशी श्रींचा परिसर आणि 04 जुलै रोजी पहाटे श्रींची काकड आरती होणार नाही. या दिवशी रात्री 10.00 ते 05.00 या वेळेत मंदिराशेजारील रंगमंचावर इच्छुक कलाकारांचा साईभजन कार्यक्रम होणार आहे.

संजीव कुमार यांचा भजन कार्यक्रम : उत्सवाच्या समारोपाच्या दिवशी, मंगळवार 04 जुलै रोजी सकाळी 05.05 वाजता मंगलस्नान, श्रींचे दर्शन, सकाळी 06.50 पाद्यपूजा, गुरुस्थान मंदिरात सकाळी 07.00 वाजता गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार, सकाळी 10.00 ते 12.00 वा. आंबेगाव बु.(पुणे) येथे गोपाळकाला कीर्तन, दहीहंडीचा कार्यक्रम होणार, दुपारी १२.१० वाजता श्रींची मध्यान्ह आरती, सायंकाळी 7.00 वाजता श्रींची धुपारती होईल. 07.30 ते 09.30 PM संजीव कुमार यांचा भजन, कार्यक्रम होईल.

भक्तांना नावे नोंदवण्याचे अवाहन : उत्सवाच्या निमित्ताने व्दारकामाई मंदिरात प्रथम दिवशी होणाऱ्या साईसच्चरिताच्या अखंड पारायणासाठी जे साईभक्त इच्छुक आहेत, त्यांनी आपली नावे दिनांक ०१ जुलै २०२३ रोजी दुपारी ०१.०० ते सायंकाळी ०५.३० यावेळेत समाधी मंदिरासमोरील देणगी काऊंटर नंबर ०१ वर नोंदवावीत. सोडत पध्दतीने पारायणासाठी भक्तांची नावे त्‍याच दिवशी सायंकाळी ०५.३५ वाजता समाधी मंदिर स्‍टेज येथे चिठ्ठ्या काढून करण्यात येईल. तसेच दिनांक ०३ जुलै रोजी होणाऱ्या कलाकारांच्‍या हजेरी कार्यक्रमासाठी इच्‍छुक कलाकारांनी आपली नावे अनाऊसमेंट कक्षामध्‍ये मंदिर कर्मचाऱ्यांकडे आगाऊ नोंदवावीत. यावर्षाचा हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे मा. जिल्‍हा न्‍यायाधिश, अहमदनगर तथा समिती अध्यक्ष मा.सुधाकर यार्लगड्डा, मा. जिल्‍हाधिकारी तथा समिती सदस्‍य श्री. सिध्‍दाराम सालीमठ, मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा - Shirdi Sai Temple Security : शिर्डीतील साई मंदिरासाठी आता अतिरिक्त 'एमएसएफ'ची सुरक्षा तैनात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.