अहमदनगर - आपण या देशासाठी असे काम केले पाहिजे, की आपण एक उदाहरण बनू शकतो. देशासाठी महिलांचे योगदान मोलाचे आहे. या समारंभात देखील तरूणीच जास्त मेडल मिळवलीत, असे गौरउद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यात काढले.
हेही वाचा - जागेसाठी झालेल्या वादात प्रवाशाला चालत्या लोकलमधून फेकले बाहेर; हार्बर मार्गावरील प्रकार
राहुरी जवळील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 34 वा पदवीप्रदान समारंभ आज (गुरुवारी) राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी विद्यापीठाची विस्तृत माहिती दिली. याप्रसंगी कृषी प्रदर्शनाची पाहणी राज्यपालांनी केली. राज्यपालाच्या हस्ते दिपप्रज्वलन करून महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन करून पदवीप्रदान सोहळ्यास सुरुवात झाली.
मार्गदर्शन भाषणात राज्यपालांनी आज अनेक क्षेत्रात मुली पुढे येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ज्याही क्षेत्रात काम कराल ते करताना वेगळे उदाहरण इतरांपुढे उभे करा, असे सांगताना राज्यपालांनी स्वामी विवेकानंद, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची उदाहरणे दिली.
या पदवीप्रदान समारंभात 52 विद्यार्थ्यांना पीएच. डी, 308 विद्यार्थ्यांना पद्व्युत्तर पदवी आणि 4 हजार 707 विद्यार्थ्यांना पदवी असे एकूण 5 हजार 67 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.